पायलटचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ; एअर इंडियाचं विमान अर्ध्या वाटेतून माघारी बोलावलं

80
Adv

 मॉस्कोला निघालेलं विमान परत बोलवावं लागलं आहे. आता सर्व क्रू कॉरेंटाईन राहणार असून दुसरं विमान मॉस्कोला पाठवलं जाईल. उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलेलं हे विमान परत बोलावण्यात आलं.

दिल्ली विमानतळावर या विमानाचं आता निर्जंतुकीकरण केलं जात आहे. आता हे विमान मॉस्कोला कधी निघणार याविषयीची माहिती अजून देण्यात आलेली नाही.
शनिवारी सकाळी मॉस्कोसाठी निघालेलं एअर इंडियाचं ए-३२० निओ हे विमान उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलं होतं. जाण्यापूर्वी क्रू मेंबर्सची कोरोना चाचणी करण्यात आली होती,

ज्यापैकी वैमानिकाची चाचणी पॉझिटिव्ह आली. दरम्यान, विमान उड्डाण होण्यापूर्वी क्रू मेंबर्सची चाचणी निगेटिव्ह आहे असं चुकून वाचण्यात गेल्याची माहिती आहे. पण नंतर ही चूक लक्षात आली आणि विमान परत बोलवावं लागलं. एअर इंडियाचं हे विमान दिल्ली विमानतळावर १२.३० वाजता दाखल झालं

Adv