Friday, November 27, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District कोरेगावात शिंदेसेनेचा युवा धमाका! आकाश साबळे ‘तात्या’ यांच्या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चांना...

कोरेगावात शिंदेसेनेचा युवा धमाका! आकाश साबळे ‘तात्या’ यांच्या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

385
Adv

सातारा : कोरेगावच्या राजकीय वर्तुळात शिवसेनेचे संघटन विस्तारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. युवा नेते आकाश साबळे ‘तात्या’ यांचा उद्या, शनिवार दि. २८ नोव्हेंबर रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे. चौफाळा, कोरेगाव येथे सायंकाळी ६ वाजता पर्यटनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

आकाश साबळे ‘तात्या’ यांच्याकडे युवकांची तगडी फळी असून त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कोरेगावातील युवा राजकारणात नवी घडामोड घडणार आहे. युवकांचे संघटन आणि कार्यकर्त्यांचा मोठा संपर्क ही साबळे यांची जमेची बाजू मानली जात आहे.

विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सातारा जिल्ह्यात नव्या चेहऱ्यांचे प्रवेश सुरू असल्याने पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती मिळताना दिसत आहे. युवा नेतृत्वाला सोबत घेत जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आकाश साबळे ‘तात्या’ यांच्या प्रवेशाकडे कोरेगावसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Adv