Sunday, November 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City दालतवाडा ते नगरपालिका, मोती चौक ते ५०१ पाटीपर्यंत अतिक्रमणांचे मोजमाप होणार!

दालतवाडा ते नगरपालिका, मोती चौक ते ५०१ पाटीपर्यंत अतिक्रमणांचे मोजमाप होणार!

216
Adv

सातारा शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आदालत वाडा ते नगरपालिका तसेच मोती चौक ते ५०१ पाटी या प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणांचे येत्या दोन ते तीन दिवसांत मोजमाप करण्यात येणार आहे. सातारा नगरपरिषदेचे नियोजन सभापती अशोक शेडगे यांनी ही माहिती दिली.
शहरातील अतिक्रमणांबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही. या कारवाईमध्ये कोणताही राजकीय दबाव स्वीकारला जाणार नाही. अतिक्रमण करणारी व्यक्ती कोणीही असो, नियमबाह्य अतिक्रमण आढळल्यास ते निश्चितपणे काढण्यात येईल, अशी ठाम भूमिका अशोक शेडगे यांनी मांडली आहे. त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासन प्रत्यक्ष किती कठोर भूमिका घेते आणि अतिक्रमण हटाव मोहीम किती प्रभावीपणे राबवते, याकडे सातकरांचे लक्ष लागले आहे.

Adv