सातारा : रविवार पेठेतील टपऱ्यांवरून निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी सातारा नगरपरिषदेला पत्र देऊन संबंधित टपऱ्यांवरील अतिक्रमण हटविण्याबाबत कळविले आहे. त्यामुळे पोलिसांच्या पत्रानंतर नगरपरिषद प्रशासनाकडून रविवार पेठेतील संबंधित टपऱ्या हटविण्याची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई पोलीस बंदोबस्तात होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या टपऱ्यांच्या प्रकरणात राजकीय नेत्यांचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासन नियमानुसार कारवाई करणार असून, कोणत्याही राजकीय दबावाचा प्रश्न नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणात विविध नेत्यांची नावे चर्चेत असली, तरी प्रत्यक्षात नेत्यांच्या हस्तक्षेपाची केवळ चर्चाच असल्याचे चित्र आहे.
रविवार पेठेतील टपऱ्यांवरून झालेल्या वादानंतर पोलिसांनी थेट नगरपरिषदेला पत्र दिल्याने आता प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नेत्यांच्या नावांची विनाकारण चर्चा कशासाठी? टपऱ्या निघणार पोलिसांच्या पत्रानेच!
साताऱ्यातील रविवार पेठेतील टपऱ्यांच्या प्रकरणावरून राजकीय नेत्यांची नावे विनाकारण चर्चेत आणली जात असताना, प्रत्यक्षात सातारा पोलिसांनीच नगरपरिषदेला अतिक्रमण हटविण्याबाबत पत्र दिले आहे. या पत्राच्या आधारे नगरपरिषद प्रशासन संबंधित टपऱ्या पोलीस बंदोबस्तात हटविणार आहे. या प्रकरणात कोणत्याही राजकीय नेत्याचा हस्तक्षेप नसल्याचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी स्पष्ट केल्याने नेत्यांच्या नावाची चर्चा नेमकी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.






