Thursday, October 15, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District नागठाणे आरोग्य केंद्राला याशनी नागराजन यांची अचानक भेट

नागठाणे आरोग्य केंद्राला याशनी नागराजन यांची अचानक भेट

43
Adv

सातारा, दि. १५ ऑक्टोबर २०२६ : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सर्वसमावेशक आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेत जिल्हा परिषद साताऱ्याच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्र, नागठाणे येथे अचानक भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवा, औषधसाठा, स्वच्छता आणि केंद्रातील एकूण कामकाजाची माहिती घेतली. तसेच, आयुष्यमान भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण सत्रास भेट देत प्रशिक्षणाचा लाभ ग्रामीण जनतेच्या आरोग्यहितासाठी प्रभावीपणे घेण्याचे आवाहन केले.

*रुग्णसेवेचा घेतला आढावा; रुग्णांशी साधला थेट संवाद*
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध विभागांची पाहणी करून रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली. केंद्रातील औषधसाठा, परिसरातील स्वच्छता आणि आरोग्यसेवांच्या अंमलबजावणीची स्थिती याबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. आरोग्यसेवा देताना रुग्णांच्या गरजांना प्राधान्य देण्यासह उपलब्ध सुविधांचा प्रभावी वापर करण्याचे महत्त्वही या भेटीतून अधोरेखित झाले.

Adv