Sunday, October 4, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District कोरेगावसाठी सोळस्कर मैदानात; मकरंद पाटलांकडून विभागाला सूचना, दुष्काळग्रस्त यादीचा मार्ग मोकळा?

कोरेगावसाठी सोळस्कर मैदानात; मकरंद पाटलांकडून विभागाला सूचना, दुष्काळग्रस्त यादीचा मार्ग मोकळा?

111
Adv

सातारा : कोरेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये समावेश करण्याच्या मागणीला आता शासनस्तरावरून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी कोरेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याबाबत संबंधित विभागाला आवश्यक सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरेगावच्या दुष्काळग्रस्त यादीतील समावेशाचा प्रश्न आता अंतिम निर्णयाच्या टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी कोरेगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्याबाबत मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी व विनंती केली होती. तालुक्यातील परिस्थितीचा विचार करून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली होती.
सोळस्कर यांच्या मागणीची दखल घेत मंत्री पाटील यांनी संबंधित विभागाला कार्यवाहीच्या सूचना केल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शासनाच्या निर्णयाकडे आता कोरेगाव तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि विविध घटकांचे लक्ष लागले आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश झाल्यास शासनाच्या नियमानुसार उपलब्ध होणाऱ्या विविध सवलती व उपाययोजनांचा लाभ तालुक्यातील पात्र शेतकरी आणि नागरिकांना मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय शासनाच्या अधिकृत आदेशानंतरच स्पष्ट होणार आहे.
कोरेगावच्या मागणीला आता शासनदरबारी किती लवकर मंजुरी मिळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Adv