Wednesday, September 30, 2026
spot_img
Home Satara District Jawali जिल्हा बँकेसाठी रांजणे यांचा ‘अर्ज’; जावळीचा आखाडा तापणार!

जिल्हा बँकेसाठी रांजणे यांचा ‘अर्ज’; जावळीचा आखाडा तापणार!

38
Adv

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जावळी सोसायटी मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. विद्यमान जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे हे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जावळीतील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यात जावळीच्या राजकारणात चुरशीची लढत झाली होती. यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंच्या हालचालींना पुन्हा वेग आल्याचे चित्र आहे. जावळी तालुक्यातील सोसायट्यांच्या ठरावांवरूनही गेल्या काही महिन्यांपासून राजकीय रस्सीखेच सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
विद्यमान संचालक म्हणून रांजणे यांचा अर्ज आणि जावळीतील बदलती राजकीय समीकरणे यामुळे आगामी काळात सोसायटी मतदारसंघातील चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ ऑक्टोबर असून त्यानंतर छाननी व माघारीच्या टप्प्यात उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Adv