सातारा प्रतिनिधी : सातारा शहरातील वाढती पार्किंगची समस्या, बेशिस्त वाहनतळ आणि रिक्षा स्टॉपमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही वाहतूक विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करत अमित रामचंद्र शिंदे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
शहरातील फुटपाथवर वाहने पार्क केली जात असून, संबंधित वाहनांवर कारवाई करण्याऐवजी ती तशीच ठेवली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असून ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यातून छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांकडून दुकानांसमोरील पार्किंगच्या जागेत लोखंडी अँगलचे सांगाडे ठेवले जात असल्याने नागरिकांचे पाय अडकून अपघात होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. हे सांगाडे हटवून फुटपाथ व पार्किंगची जागा मोकळी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत दुकानांसमोर भाजी विक्रेत्यांच्या अॅपे रिक्षा रस्त्यावर आडव्या लावल्या जात असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे म्हटले आहे. याचा फटका शहराच्या पश्चिम भागातील ज्येष्ठ नागरिकांसह रुग्णवाहिकांनाही बसत असल्याचा आरोप आहे.
राजवाडा परिसरातील रिक्षा स्टॉपचाही प्रश्न तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. कल्पना हॉटेलजवळ राजधानी टॉवर्सजवळ, नगरपालिका वाचनालयासमोर, एस.टी. बसस्थानकासमोर तसेच जुन्या राजवाडा कोर्टासमोर रिक्षा स्टॉप असल्याने या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मंगळवार तळ्यावरील रिक्षा स्टॉपवरही रिक्षा आडव्या लावल्या जात असल्याने समस्या अधिक गंभीर होत असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील पार्किंग व्यवस्था,फुटपाथवरील अतिक्रमण,बेशिस्त रिक्षा पार्किंग आणि वाहतूक कोंडीवर तातडीने ठोस कारवाई करावी,अशी मागणी अमित शिंदे यांनी केली आहे.
शहरातील बेशिस्त पार्किंग आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सातारा शहर वाहतूक विभागाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते *अमित रामचंद्र शिंदे* यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
*काय आहे प्रकरण?*
श्री. शिंदे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेले कित्येक दिवसांपासून सातारा शहरात पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याबत सातारा शहर वाहतूक विभागाला वारंवार लेखी तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही.
*तक्रारीतील महत्त्वाचे मुद्दे:*
1. *फुटपाथवरील बेशिस्त पार्किंग*: वाहतूक विभागाची क्रेन सर्व्हिस फुटपाथवर पार्क केलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करत नाही. ती वाहने तशीच फुटपाथवर ठेवली जातात. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे.
2. *वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष*: यापूर्वी १५/०७/२०२६ रोजी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना यासंदर्भात अर्ज दिला होता. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
*नागरिक हैराण*
पत्रात शिंदे यांनी म्हटले आहे की, वाहतूक विभागाच्या या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्ते, पदपथ आणि रिक्षा स्टॉपचे योग्य नियोजन न झाल्याने रोजच कोंडीचा सामना करावा लागत आहे.
या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी हस्तक्षेप करून सातारा शहर वाहतूक विभागाला योग्य त्या सूचना देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
शहरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण हा मुद्दा ऐरणीवर असतानाच झालेल्या या तक्रारीमुळे आता प्रशासन काय पाऊल उचलते याकडे साताऱ्याचे लक्ष लागले आहे.






