Sunday, October 11, 2026
spot_img
Home Satara District Wai बावधनच्या शिरपेचात मानाचा तुरा भैरवनाथ देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

बावधनच्या शिरपेचात मानाचा तुरा भैरवनाथ देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

210
Adv

वाई प्रतिनिधी : बावधनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान, बावधन (ता. वाई) या पावन तीर्थक्षेत्रास महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना’ अंतर्गत अधिकृतपणे ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर झाला आहे.
या निर्णयामुळे बावधनच्या विकासाला नवी दिशा मिळण्या बरोबरच श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. भाविकांसाठी आवश्यक सुविधा, परिसराचा विकास आणि धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दर्जा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
बावधनच्या विकासासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून भविष्यात विविध विकासकामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बावधनच्या विकासाला नवी दिशा देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमारभाऊ गोरे यांचे बावधन ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Adv