Thursday, August 27, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District नगरसेवक विश्वतेज बालगुडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

नगरसेवक विश्वतेज बालगुडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

3
Adv

सातारा प्रतिनिधी : संकल्प कॉलनी परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नाला अखेर मार्ग मिळाला असून गटरकाम, रिटेनिंग वॉल आणि रस्ता कामाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण निधीतून या कामासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
संकल्प कॉलनीच्या वरील बाजूने येणाऱ्या ओढ्यातील पावसाचे पाणी वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात कॉलनीच्या मुख्य रस्त्यावरून वाहत होते. हेच पाणी शाहूपुरी ते कोंडवे जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावर शेवाळे साचून वाहतूक धोकादायक बनत होती. त्यामुळे दुचाकी व इतर वाहने घसरून अपघात होण्याच्या घटनाही घडत होत्या.
ही समस्या कॉलनीतील नागरिकांनी नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेत वैशिष्ट्यपूर्ण निधीतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला. या कामासाठी भारत भोसले सर यांचेही सहकार्य लाभले.
दरम्यान, कॉलनीतील काही ठिकाणी अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने काम सुरू करण्यास काहीसा विलंब झाला होता. मात्र कामाच्या प्रशासकीय प्रक्रियेसह अतिक्रमण काढण्याबाबत कॉलनीतील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला. प्रभागातील नगरसेवक विश्वतेज बालगुडे यांच्या प्रमुख मध्यस्थीने हा विषय लेखी स्वरूपात मार्गी लागला आणि अखेर काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.
या कामामुळे शाहूपुरीकडून कोंडव्याकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित होऊन वाहतुकीचा अडथळाही दूर होण्यास मदत होणार आहे.
कामाच्या पहिल्या टप्प्यात रिटेनिंग वॉल उभारण्याबरोबरच मोठ्या गटरची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्यानंतर रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे संकल्प कॉलनीसह शाहूपुरी-कोंडवे मार्गावरील नागरिकांचा अनेक वर्षांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Adv