मतदानाच्या 48 तास अगोदर इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियावर प्रचार करण्यास बंदी वर्तमानपत्रात प्रमाणित करुनच जाहिरात देता येईल

130
Adv

मतदानाच्या 48 तास अगोदर इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मीडियावर प्रचार करण्यास बंदी आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रात उमेदवारांना जाहिराती देता येतील. या जाहिराती माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.
वृत्तपत्रात देण्यात येणाऱ्या जाहिराती भडकावू, गैरसमज पसरविणाऱ्या किंवा द्वेष पसरविणाऱ्या नसु नयेत. या सर्व बाबी वेळोवेळी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना, वर्तमानपत्रांना सांगण्यात आलेल्या आहेत. मतदानाच्या पूर्वी 48 तास अगोदर इलेट्रॉनिक तसेच सोशल मीडियावर प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातलेली आहे, याचे काटेकोरपणे पालन करावे. जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती यावर विशेष लक्ष देणार आहे.

Adv