Sunday, August 23, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District महामंडळाच्या नियुक्त्यांकडे दिग्गजांचे लक्ष

महामंडळाच्या नियुक्त्यांकडे दिग्गजांचे लक्ष

121
Adv

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपशी थेट योगदान नसलेल्या अनेक मान्यवरांना सध्या केंद्र व राज्यातील महामंडळांच्या नियुक्तीचे वेध लागले आहेत. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे जुळविताना अनेक इच्छुकांनी महामंडळाच्या यादीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
निवडणुकांनंतर राज्य सरकारकडून विविध महामंडळांवर नियुक्त्या होण्याची शक्यता व्यक्त होत असून, या नियुक्त्यांमध्ये कोणाची वर्णी लागणार, याबाबत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंतांना संधी मिळणार की राजकीय समीकरणे साधणाऱ्या नव्या चेहऱ्यांना महामंडळाची लॉटरी लागणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
विशेषतः सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही इच्छुकांकडून वरिष्ठ पातळीवर संपर्क वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची राजकीय चर्चा आहे. त्यामुळे महामंडळाच्या नियुक्त्यांमध्ये पक्षनिष्ठा, संघटनात्मक योगदान आणि निवडणुकीतील भूमिका यांना प्राधान्य मिळणार का, हा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.
मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार की राजकीय सेटलमेंट करणाऱ्यांना संधी मिळणार? याचे उत्तर आगामी नियुक्त्यांमधून स्पष्ट होणार आहे.

एका बाजूला वर्षानुवर्षे पक्षसंघटनेसाठी काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते संधीच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला राजकीय वजन असलेले दिग्गजही महामंडळासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या महामंडळाच्या नियुक्त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपमधील इच्छुकांसोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेतेही महामंडळाच्या प्रतीक्षेत असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.

Adv