Monday, August 17, 2026
spot_img
Home Satara District Satara City सातारा कंदी पेढ्याच्या GI मानांकनासाठी दिल्लीतील प्रक्रिया पूर्णत्वाकडे

सातारा कंदी पेढ्याच्या GI मानांकनासाठी दिल्लीतील प्रक्रिया पूर्णत्वाकडे

191
Adv

साताऱ्याची खास ओळख असलेल्या सातारा कंदी पेढ्याला भौगोलिक मानांकन (GI Certification) मिळवून देण्यासाठीच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे.

दिल्ली येथे GI सर्टिफिकेशनसाठी आवश्यक असलेली उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची बहुमूल्य मदत मिळाली.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आणि पद्मभूषण डॉ. रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा कंदी पेढ्याला भौगोलिक मानांकन मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. GI मानांकन प्राप्त झाल्यानंतर सातारा कंदी पेढ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठी उंची मिळण्याची अपेक्षा आहे.
या प्रक्रियेत अॅड. विनीत पाटील आणि संग्राम बर्गे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत आहे. दिल्लीतील या प्रक्रियेदरम्यान काका धुमाळ आणि सुनीलतात्या काटकर यांचीही उपस्थिती होती.
साताऱ्याची पारंपरिक ओळख आणि चव देशभर पोहोचविण्यासाठी GI मानांकन महत्त्वपूर्ण ठरणार असून, या माध्यमातून सातारा कंदी पेढ्याला स्वतंत्र भौगोलिक ओळख आणि अधिकृत मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Adv