Tuesday, October 6, 2026
spot_img
Home Satara District Wai वाईत पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक

वाईत पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक

149
Adv

वाई, दि. ७ : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाई शहरात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज (७ जुलै) दुपारी १२.३० वाजता सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, वाई नगरपरिषद येथे होणार असून शहरातील पूरस्थिती, नागरिकांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजना, आपत्कालीन सेवा, निचरा व्यवस्था, तसेच संभाव्य धोका असलेल्या भागांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सर्व नगरसेवकांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीचे निर्णय या बैठकीत घेतले जाण्याची शक्यता आहे.

Adv