Tuesday, June 30, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City १११ वर्षांचा इतिहास जपणारा क्षेत्रमाहुलीचा विलिंग्डन पूल; शिलालेख आजही साक्ष देतो दर्जेदार...

१११ वर्षांचा इतिहास जपणारा क्षेत्रमाहुलीचा विलिंग्डन पूल; शिलालेख आजही साक्ष देतो दर्जेदार बांधकामाची

14
Adv

१११ वर्षांचा इतिहास जपणारा क्षेत्रमाहुलीचा विलिंग्डन पूल; शिलालेख आजही साक्ष देतो दर्जेदार बांधकामाची

सातारा शहरालगतच्या क्षेत्रमाहुली येथील कृष्णा नदीवरील ऐतिहासिक विलिंग्डन पुलाला १११ वर्षे पूर्ण झाली आहेत. पुलावरील शिलालेख आजही या ऐतिहासिक वास्तूचा समृद्ध इतिहास सांगत उभा आहे.

पुलावरील इंग्रजी शिलालेखानुसार, या पुलाचे काम १९११ मध्ये सुरू झाले आणि १९१५ मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर २८ जून १९१५ रोजी तत्कालीन बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. शिलालेखावर ही माहिती स्पष्टपणे कोरलेली असून आजही ती इतिहासाची साक्ष देत आहे.

विशेष म्हणजे, शतकाहून अधिक काळ उलटल्यानंतरही हा पूल अजूनही भक्कम आणि सुस्थितीत आहे. आजच्या काळात काही नवीन बांधकामे अल्पावधीतच निकृष्ट दर्जामुळे तडे जाणे किंवा कोसळण्याच्या घटना घडत असताना, १११ वर्षांपूर्वी उभारलेला हा पूल दर्जेदार अभियांत्रिकी आणि गुणवत्तापूर्ण बांधकामाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

इतिहासाची साक्ष देणारा हा पूल साताऱ्याच्या वैभवशाली वारशाचा महत्त्वाचा भाग असून, त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Adv