Friday, June 26, 2026
spot_img
Home Satara District Koregaon कोरेगावच्या आमदारकीची आतापासूनच रणधुमाळी

कोरेगावच्या आमदारकीची आतापासूनच रणधुमाळी

161
Adv

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पुढील निवडणुकीला अजून अवधी असतानाच आमदारकीच्या दावेदारांची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित म्हणून ओळख असलेले दयानंद भोसले यांचे “कोरेगावचे भावी आमदार” असे उल्लेख असलेले सोशल मीडियावरील पोस्टर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, दयानंद भोसले यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याची कोणतीही घोषणा झालेली नसतानाही त्यांचा शिवसेनेच्या संभाव्य उमेदवाराप्रमाणे उल्लेख होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.

कोरेगाव मतदारसंघात आधीपासून शिवसेनेचा आमदार असताना राष्ट्रवादीशी संबंधित पदाधिकाऱ्याचा “भावी आमदार” म्हणून प्रचार करणारे पोस्टर व्हायरल होणे हे स्थानिक राजकारणात महत्त्वाचे मानले जात आहे. या पोस्टरमागे नेमकी कोणाची रणनीती आहे, की हा केवळ समर्थकांचा उत्साह आहे, याबाबतही चर्चा रंगली आहे.

आता या संपूर्ण घडामोडींची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार का, तसेच शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व यावर काय भूमिका घेणार, याकडे कोरेगावसह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Adv