पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात जयकुमार गोरे हे पावरफुल नेते म्हणून उदयास आले आहेत. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये त्यांनी आपले स्वतंत्र राजकीय वर्चस्व निर्माण केले असून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधान परिषद निवडणुकांपर्यंत त्यांचा प्रभाव दिसून येत आहे.
“मैत्री करावी तर जयकुमार गोरे यांच्याशीच आणि कार्यकर्त्याला राजकीय ताकद द्यावी तर जयकुमार गोरे यांनीच,” अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. कार्यकर्त्यांना संधी देणे, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आणि संघटन मजबूत ठेवणे ही त्यांची खास शैली मानली जाते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या शब्दाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेते त्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवून असतात.आता आगामी विधानपरिषद निवडणुकांमध्येही जयकुमार गोरे यांचाच बोलबाला असल्याची चर्चा असून पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये त्यांचे स्थान अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक तरुण कार्यकर्त्यांना राजकारणात नवी दिशा आणि संधी मिळाल्याचे समर्थकांचे मत आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते,संघटन कौशल्य कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास यामुळे जयकुमार गोरे हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावी नेतृत्व म्हणून अधिक ठळकपणे पुढे येत आहेत.
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रस्थापित नेत्यांनी वर्षानुवर्षे सत्ता आणि संघटनांवर वर्चस्व राखले आहे. मात्र, आगामी काळात हे नेते नव्या कार्यकर्त्यांना आणि जुन्या जनतेने निष्ठावंत कार्यकर्त्यांना व युवा नेतृत्वाला कितपत संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय वर्तुळात एकच प्रश्न उपस्थित केला जात आहे—”कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या की आता त्यांनाही नेतृत्वाची संधी मिळणार?” आगामी काळात याचे उत्तर पक्षांच्या निर्णयांमधून आणि उमेदवारी वाटपातून स्पष्ट होणार आहे.
राजकारणात केवळ नेत्यांची ताकद नव्हे, तर कार्यकर्त्यांची फौज महत्त्वाची असते. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित नेते नवीन चेहऱ्यांना संधी देणार का, की पुन्हा त्याच मोजक्या मंडळींनाच संधी मिळणार, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.






