Saturday, May 30, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हा परिषदेतील राड्यानंतर भाजपच्या सर्व सदस्यांना डिनर ची मेजवानी

जिल्हा परिषदेतील राड्यानंतर भाजपच्या सर्व सदस्यांना डिनर ची मेजवानी

331
Adv

सातारा : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षांची ‘डिनर डिप्लोमसी’ चर्चेत सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांनी आज भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांना सहकुटुंब स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे आज सायंकाळी सात वाजता आमदार महेश शिंदे यांच्या खटाव येथील निवासस्थानी स्नेहसंमेलन होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे

सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक जवळ येत असताना आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहभोजनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद सदस्य, त्यांचे कुटुंबीय आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये संवाद वाढविणे, संघटनात्मक एकजूट मजबूत करणे आणि आगामी राजकीय रणनीतीवर अनौपचारिक चर्चा करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.राजकीय जाणकारांच्या मते, निवडणुकीच्या तोंडावर आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्याला ‘डिनर डिप्लोमसी’चे स्वरूप प्राप्त झाले असून, त्यातून पक्षातील समन्वय आणि आगामी निवडणुकां साठीची तयारी अधोरेखित होत आहे. दरम्यान, या कार्यक्रमात विधान परिषद निवडणुकीसह जिल्ह्यातील विकासकामे, पक्ष संघटन आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां बाबतही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आजच्या या स्नेहभोजनाकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Adv