Sunday, May 24, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City उत्तर भागात आकाश सोळसकर ठरले युवा भगीरथ

उत्तर भागात आकाश सोळसकर ठरले युवा भगीरथ

62
Adv

कोरेगाव तालुक्यातील उत्तर भाग हा तसा दुष्काळग्रस्तच पाणी प्रश्न सोडत म्हणून निवडून आलेले जिल्हा परिषद अमित चव्हाण काम कमी आणि रिल्स जास्त अशीच त्यांची आतापर्यंतची प्रतिमा दिसत असून उत्तर भागातील पाणी प्रश्न प्रकरणी ते कुठेही दिसले नसलेले नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे

सोळशी चौवनेश्वर रणदुलाबाद मोरबेंद नायगाव या कोरेगावातील उत्तर भागात पंचायत समितीचे सदस्य आकाश सोळसकर यांच्या माध्यमातून मंजूर होऊन या गावांना पाणी मिळाले त्यामुळे खऱ्या अर्थाने उत्तर भागाला युवा भगीरथ मिळाला असल्याची लोकभावना येथील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे

पाणी प्रश्ना प्रकरणी निवडून येऊन आपण संबंधित भागांकडे न फिरकणे म्हणजे हे घोर पापच म्हणावे लागेल येथील जिल्हा परिषदेचे काम कमी आणि रिल्स जास्त अशाच मूडमध्ये ते वावरत असतात गल्ली पासून दिल्ली पळून माझी ओळख मात्र काम शून्य अशी त्यांची आता नवीन ओळख निर्माण झाली आहे

कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना, पंचायत समिती सदस्य आकाश सोळस्कर यांनी पुढाकार घेत गावागावात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. युवकांच्या नेतृत्वातून लोकहिताचे काम उभे राहत असल्याने नागरिकांतून त्यांचे कौतुक होत आहे.

ऐन उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असताना आकाश सोळस्कर यांनी खासदार नितीन पाटील यांच्या माध्यमातून प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करत टँकर, विहिरींची व्यवस्था तसेच पाणीपुरवठा योजनांवर भर दिला. अनेक गावांमध्ये नागरिकांना दिलासा मिळाल्याने उत्तर भागातील ग्रामस्थांनी त्यांना “युवा भगीरथ” अशी उपाधी दिली आहे.
सामाजिक बांधिलकी जपत सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असून, पाणीप्रश्न सोडविण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील महिलांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या या कामामुळे युवकांमध्येही सामाजिक कार्याची प्रेरणा निर्माण होत आहे.

Adv