तुषार दोषींना बडतर्फ करा.. रेश्मा जगताप

16
Adv

सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला व समाजकारणाला वैचारिक परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान जे दबाव नाट्य, अटक सत्र आणि राज्याच्या मंत्री महोदयांना धक्काबुक्कीचे प्रकार झाला तो निंदनीय आहे.

यात सत्ता स्थापन करण्यास मदत करणाऱ्या सातारा एसपीना बडतर्फ करण्यासाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवतीर्थ पोवई नाका असा शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी मूक मोर्चा काढला.

शिवसेना व राष्ट्रवादी यांनी निवडणूक पूर्व युती जाहीर करून बहुमतासाठी आवश्यक ते 37 संख्या बळ जुळवले होते. असे असताना विरोधकांनी बळाचा वापर करून प्रचंड दांडगाई केली. त्यादिवशी पोलिसांची भूमिका ही सत्ताधाऱ्यांना धार्जिणी किंबहुना घरगड्यासारखी होती. यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली. खा. नितीन पाटील व ना. मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला असून जिल्ह्याच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासला गेला आहे. जि. प. मधील गोंधळ नाट्याची न्यायालयीन चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी. सीसीटीव्ही फुटेज सर्वांसाठी खुले करून नक्की त्या दिवशी काय घडले हे जनतेसमोर आणावे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड रद्द करून नव्याने फेर निवड घेण्यात यावी. संबंधित प्रकरणातील शासकीय स्तरावरील दोषी अधिकाऱ्यांच्या तत्काळ बडतर्फ करून त्यांच्या जागेवर कर्तव्यनिष्ठ अधिकारी नेमावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Adv