एकहाती सत्ता आनण्याची घोषणा करणाऱ्या भाजपचे राजकीय गर्वहरण

13
Adv

जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदरच सातारा जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता आणण्याची घोषणा जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी केली मात्र निवडणुकीनंतर जरी मोठा पक्ष म्हणून भाजप ठरला असला तरी संख्याबळ गाठण्यासाठी त्यांचे राजकीय गर्वहरण झाले असल्याचे दिसून येते तसे काही नेत्यांनी मान्य ही केले

जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदरच महायुतीच्या नेत्यांवर टीकाटिपणी करून राजकीय वातावरण दूषित केले होते जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान भाजपला संख्याबळ गाठता येत नसल्याने राज्यातील देवाचाच आधार घेऊन जिल्ह्यातील भाजप नेत्यांना चालावे लागत असेल तर ते नेते राजकारणात खूप मागे असल्याचे बोलले जात आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही जिल्हा परिषद निवडणुकीत टिकेला समोर जावे लागले

सातारा फलटण वाई पाटण कराड या मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांवर भाजपच्या मंत्री महोदयांनी टीकास्त्र केले हे टीकास्त्र एवढे जिवारी होते की जिल्ह्यात महायुती अस्तित्वात आहे की नाही हे कळायला मार्ग नव्हते आता मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान संख्या बळ गाठता येत नसल्याने भाजपच्या नेत्यांना महायुती आठवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

Adv