म्हसवड नगरीतील अतिक्रमण जमीनदोस्त

53
Adv

(अजित जगताप)
म्हसवड दि: माण तालुक्यातील सिद्धनाथाच्या आशीर्वादाने उभे असलेल्या म्हसवड नगरीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाने घेरावा घातला होता. त्याचा परिणाम म्हणून म्हसवड नगरी जलमय झाली होती. अतिक्रमणाचा मुद्दा काही प्रसार माध्यमांनी उचलून धरला. अखेर आज पावसाची उघडीत मिळतात म्हसवड नगरीतील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यास भाग पाडले. या सकारात्मक भूमिकेमुळे अनेकांनी म्हसवड प्रशासन व प्रसार माध्यमाला धन्यवाद दिले आहेत.

माण तालुक्यात कोसळणाऱ्या पावसामुळे म्हसवड नगरीतील सकल भागातून पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. ओढे नाले मुजविण्यात आल्याने अतिक्रमण काढावे लागेल. या आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेऊन आज रविवारी सुट्टी असतानाही अतिक्रमण काढण्यात आले.शनिवारी दि:२७ सप्टेंबर रोजी पावसाचे पाण्याला नैसर्गिक वाट न मिळाल्यामुळे अखेर अतिक्रमण झालेल्या भागात व बेसमेंट मध्ये पाणी शिरून दुकानदारांचे हे नुकसान झाले. दुकानांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करत असतानाच आपर तहसीलदार मीना बाबर यांनी अतिक्रमणाकडे लक्ष वेधून अतिक्रम हटाव मोहीम सुद्धा सुरू केली. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत व पोलिसांनी व नागरिकांनीही या अतिक्रमणाबाबत सकारात्मक पाऊल टाकले आहे. दरम्यान, काल झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसुल विभागाने सुरु केले असल्याचे म्हसवडच्या अपर तहसिलदार मीना बाबर, म्हसवड नगरीचे मुख्यधिकारी डॉ. सचिन माने यांनी सांगितले, तर म्हसवड पालिकेने सुरु केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिम यशस्व
म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी कायदेशीर रित्या अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले. म्हसवड शहरात काल झालेल्या मुसळधार पावसाने म्हसवड बस स्थानक ते शिंगणापुर चौक या या अतिक्रमणाविरोधात म्हसवड पालिकेने मोठ्या पोलीस फाट्यासोबत तीव्र मोहीम राबवून यापरिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त केली. म्हसवड शहरातील अत्यंत महत्वाचे जागी बंदीस्त गटारावर पावसाळी छत्रींसारख्या टपऱ्या उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे गटारे स्वच्छ करण्यास अडचणी येत होत्या, त्यामुळे कचरा साठल्यामुळे पाणी रस्त्यावर बेसमेंट मध्ये शिरले. म्हसवड जलमय झाले होते. अखेर अतिक्रमण काढल्यामुळे भविष्यात व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच प्रसार माध्यमांनी याबाबत आवाज उठवल्यामुळेच ही कारवाई झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Adv