राज्यातील लोकप्रतिनिधींच्या दारासमोरच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची हाय व्होल्टेज वायर गेल्या आठ दिवसापासून सर्वसामान्यांच्या डोक्यावर मृत्यू म्हणून नाचत असून संबंधित विद्युत वायर कधीही पडू शकते अशी अवस्था निर्माण झाली आहे
लोकप्रतिनिधींकडे सर्वसामान्यांची कामासाठी कायम वर्दळ असते ही वायर अशीच जर खाली खाली येत राहिली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते या विद्युत तारेचा वेळीच ताण काढून mseb ने आपले काम चोख बजावे अशी अपेक्षा येतील नागरिकांक व्यक्त केली
शुक्रवार पेठ हा प्रभाग तसा लोकप्रतिनिधींचाच प्रभाग म्हणून ओळखला जातो त्याच लोकप्रतिनिधींच्या प्रभागात महाराष्ट्र राज्य विद्युत हाय व्होल्टेज वायर गेल्या 8 दिवसांपासून खाली खाली येत आहे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या उच्च अधिकारी यांना याची कल्पना देऊनही सदरचे काम झाले नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ लोकांच्या जीवाशी खेळते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे काही विद्युत पोल हे जीर्ण अवस्थेत झाले आहेत मात्र महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ या पोल बदली संदर्भात कुठलीही तसदी घेत नसून पुढे मोठा संभाव्य धोका निर्माण झाला तर mseb याला कारणीभूत असेल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे