पालकमंत्री पदाच्या घोषणा अवस्था कभी खुशी कभी गम

348
Adv

पालकमंत्री पदाच्या घोषणेनंतर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात खुशी कम गम ज्यादाच पहायला मिळाले लोकसभा विधानसभेत भाजपचे वर्चस्व तरीही बालेकिल्ल्यात धनुष्यबाणाचा निशाणा बसल्याने कोरेगाव पाटणचे पारडे जड असल्याचे प्राथमिक बोलले जाते

जिल्ह्यात भाजपची एक हाती सत्ता असून मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या दोन मंत्री महोदयांना वजनदार खाती मिळाली त्यानंतर भाजपने पालकमंत्री पदावर दावा केला होता जवळपास भाजपचेच मंत्री महोदय पालकमंत्री होणारअशी आशा जिल्ह्याला लागली होती या लागलेल्या आशेवर अचानक पर्यटनाच्या बाणाचा निशाणा बसल्याने मनात असलेले सजलेले जिल्ह्या तील भाजपच्या मतदार व नागरिकांच्या मनातील बांधकाम ढासळून जिल्ह्याचा विकास करणारे ग्रामविकास हि हद्दीबाहेर गेले

महायुतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मदत करून पुनर्वसन करण्याचे महायुतीच्या नेत्यांचे स्वप्न भन्गले राज्यात पालकमंत्री पदाची घोषणा झाली मात्र भाजप सह महायुतीवर खाजगीत एक प्रकारे नाराजीचा सुर उमटला

तिकडे भरत शेठ गोगावले यांचीही नाराजी झाली असून त्यांच्या समर्थनार्थ सेनेचे दोन मंत्री महायुतीच्या नेत्यांशी बोलणार असल्याचे समजते

Adv