शिर्डी येथील अधिवेशनात श्री रामराजे यांची उपस्थिती

791
Adv

लोकसभा विधानसभा निवडणुकीत अदृश्य असलेले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या शिर्डीतील अधिवेशनात दिसल्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महायुतीतच असल्याचे सिद्ध झाले आहे

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अदृश्य होते आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हेही या निवडणुकीत आदर्श होते मात्र शिर्डी येथील गेल्या आठवड्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात ते उपस्थित होते तेव्हाच सातारानामाचे वृत्त होते की रणजीतसिंह ची भाजपमध्ये पुन्हा एन्ट्री श्रीमंत रामराजे हे हि लवकरच महायुतीत ते आज खरं ठरले त्याला कारण हि तसेच की शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची लक्षणीय उपस्थिती

विधानसभा निवडणुकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका टिपणी झाली मात्र ते अदृश्य असल्याने कुठलीही प्रतिक्रिया आली नाही आज शिर्डी येथे राष्ट्रवादीचे अधिवेशन सुरू झाले या अधिवेशनात मान्यवरांच्या बरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हेही उपस्थित असल्याने आगामी जिल्ह्याच्या राजकारणात महायुती नक्कीच जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अग्रेसर राहील अशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या महायुतीतील पुन्हा राजकीय एन्ट्रीने राजे गटाला एक प्रकारे नवीन संजीवनीच मिळाली आहे

Adv