
राजवाडा येथील गुरांच्या दवाखान्यातील मेडिकल वेस्ट जाळल्या प्रकरणी चौकशी अधीकारी नेमलेल्या सावंत नमक डॉक्टरांची भूमिका संशयास्पद
गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत असलेल्या राजवाडा येथील गुरांच्या दवाखान्यातील गुरांचे मेडिकल वेस्ट डॉक्टरांसह तेथील कर्मचाऱ्यांनी भरदिवसा जाळले होते याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार यांनी संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते मात्र चौकशी करणारे डॉक्टर सावंत यांचीच भूमिका आता संशयास्पद वाटत असून हे मेडिकल वेस्ट जाळण्यात या सावंत डॉक्टरांचा हातभार तर नाही ना अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे
गुरांचे मेडिकल वेस्ट जाळणे हा अतिशय गंभीर प्रकार असून याची चौकशी वरिष्ठ पातळीवर करण्याची तयारी सुरू होती मात्र गेल्या दोन महिन्यांपासून याची चौकशी होत नसल्याने पाणी कुठे मुरते याचा शोध घेणे गरजेचे असून सावंत नामक डॉक्टर यांनाच या प्रकरणी आता जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी जाब वाचरणे गरजेचे वाटू लागले आहे चौकशी अधिकाऱ्यांना चौकशी करण्यासाठी वेळ नसेल तर गुरांच्या दवाखान्यातील संशयाची सुई डॉक्टर सावंत यांच्यापर्यंत येऊन पोहोचते नक्की कुठे लक्ष्मी दर्शन झाले याची आता सविस्तर चौकशी करणे गरजेचे आहे






