Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पोलीस बांधवावर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करा

पोलीस बांधवावर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करा

466
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

सातारा बस स्थानक येथे आपली नियमित सेवा बजावत असणाऱ्या सातारा जिल्हा पोलीस दलातील अंमलदार दत्ता पवार यांचेवर सार्वजनिक परिसरात धिंगाणा घालणाऱ्या काही गुंडप्रवृत्तीच्या युवकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केले असता चक्क पोलीस अंमलदार दत्ता पवार यांचेवर कोयत्याने वार करून दहशत निर्माण करणेचा प्रयत्न केला आहे.

या प्रकरणी जिल्हाधिकारी सातारा याना निवेदन देणेत आले आहे.पोलीस अहोरात्र जनतेच्या सुरक्षेची काळजी घेत असतात परंतु रक्षणकर्त्यावर च असे जीवघेणे हल्ले राजधानी सातारा येथे होत असतील तर हि बाब अतिशय निंदनीय असून पोलीस बांधवांचे मनोबल खच्चीकरण करणारी असलेचे किरण खरात यांनी सांगितले आहे. कायम रस्त्यावर उतरून सेवा बजावणाऱ्या पोलीस दलातील कर्मचारी यांचेसोबत झालेल्या या दुष्कृत्याचा सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस परिवाराकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या हल्ला प्रकरणातील सर्व आरोपीना तात्काळ अटक करून त्यांचे वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून उचित कारवाई करावी अशी मागणी पोलीस बॉईज तर्फे करणेत आली आहे. यावेळी वैभव माने रोहित सोनावणे राहुल उमापे आदी पोलीस कुटुंबीय उपस्थित होते.

Adv