चला जिल्हा परिषदेमध्ये मंजूर झालेल्या शाळा दुरुस्तीच्या कामांच्या शिफारसी देण्याचे काम चालू आहे जिल्हा परिषदेतील दोन चंगू मंगूंनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर डावलून शाळा दुरुस्तीच्या शिफारशी घेतल्या असल्याचे चर्चा जिल्हा परिषद रंगू लागली आहे
एन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना जपण्याचे काम हे सर्व लोकप्रतिनिधींचे असते मात्र सातारा जिल्ह्यात लोकप्रतिनिधींचे कारभारी म्हणजे कानापेक्षा मोती जड अशी अवस्था सध्या पाहायला मिळते जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन यांचा कारभार आपल्याला पहावयास दिला म्हणजे आपण या समितीचे मालक झालो अशा अभिर भावात काही कारभारी वागत असून आपल्या ठराविक कार्यकर्त्यांनाच काम देऊन आता पुन्हा नवीन आलेल्या शाळा दुरुस्त्यांच्या कामाच्या शिफारशी ही ठराविक स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच नेत्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काय करायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे
जिल्हा परिषद जिल्हा नियोजन समिती म्हणजे या कारभारीन साठी एक प्रकारे स्वतःसाठी कुरणच असल्याचे गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळते फुकट काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी कधीही घाम गाळला नाही अशा कार्यकर्त्यांना मोठ्या करण्याचे काम हे चंगू मंगू करत असून यांना वेळीच आवर घातला नाही तर कार्यकर्ता शिल्लक राहणार नाही असे सध्याचे चित्र दिसत आहे





