Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City आंध्र प्रदेशातही विधानसभा निवडणुकीचा जल्लोष

आंध्र प्रदेशातही विधानसभा निवडणुकीचा जल्लोष

123
Adv

देशातील लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आंध्र प्रदेशातही विधानसभा निवडणुकीचा जल्लोष सुरू आहे. अजून निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा निश्चित केल्या नसल्या तरी, यावेळी या निवडणुका मे महिन्यात होऊ शकतात. दरम्यान, राज्यातील राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी पूर्ण तयारी केलीय. जागांसाठीचे उमेदवारही निश्चित करण्यास सुरुवात केली आहे.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी टीडीपी आणि जनसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केल्याचे समोर आलंय. या यादीत सुशिक्षित वर्गातील उमेदवारांची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात येतंय.

हेही वाचाचंद्राबाबू भाजपसोबत येण्याची औपचारिकता पूर्ण ! पवन कल्याण यांच्यासोबतही जागावाटप ठरल्याची चर्चाउमेदवारांची पहिली यादी समोर  Andhra Assembly Elections।प्राप्त माहितीनुसार, तेलुगु देसम पार्टी-जनसेना पार्टी युतीने आज आंध्र प्रदेश निवडणुक 2024 साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जनसेना अध्यक्ष पवन कल्याण यांनी संयुक्तपणे उमेदवारांची यादी जाहीर केलीय. टीडीपीचे सुप्रीमो एन चंद्राबाबू नायडू कुप्पममधून निवडणूक लढवणार आहेत.

Adv