Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवार म्हणाल्या…

निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवार म्हणाल्या…

186
Adv

राज्यसभेच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आता लोकसभेसाठी तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार यांच्याकडून कोणता उमेदवार दिला जाणार याची चर्चा रंगली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरतील अशा चर्चा होत्या. आता बारामतीत लोकसभेला सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कामाचा आढावा सांगणारा प्रचार रथ फिरू लागला असल्याचेही दिसून आले आहे.
अशात  सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्या म्हणाल्या,’तुम्ही माझ्यावर नेहमीच खूप प्रेम करता. हे प्रेम असेच उदंड राहणार आहे, याची मला खात्री आहे. हे प्रेम शेवटपर्यंत असंच राहू द्या. तुमचे हे प्रेमच माझी उर्जा असणार आहे. तुमचे पाठबळ हीच माझी शक्ती आहे. अजित पवार यांच्यावर तर तुम्ही अनेक वर्षांपासून प्रेम करता. ते तर तुमचेच आहेत. मी तुमची सून असूनही मला तुम्ही जीव लावला. याला उतराई होण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू. बारामतीकर, काटेवाडीकर येथील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी अजित पवार सतत प्रयत्न करत असतात. इथून पुढेदेखील त्यांचा हाच प्रयत्न राहील,” अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या या भाषणानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वृतळात चर्चांना उधाण आले आहे.

Adv