Friday, June 5, 2026
spot_img
Home Satara District सातारा व माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही

सातारा व माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही

1944
Adv

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रमुख नेत्यांसोबत बैठक संपन्न झाली सातारा व माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आग्रही असल्याचा सूर या बैठकीत उमटला पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्ह्यात कशी वाढवता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या असून लोकसभेच्या निवडणुकीत माढा व सातारा या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणूक लढवण्यासाठी आग्रही झाली असल्याचे दिसून आली येणाऱ्या काळात नक्की कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाईल याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे दरम्यान सातारा जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत व पक्ष बळकटी करणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा दिनांक 3 मार्च रोजी साताऱ्यात होत असून या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते येणार असून मार्चमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

मुंबई येथील बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,आमदार मकरंद पाटील,दीपक चव्हाण जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब सोळसकर ,सरचिटणीस श्रीनिवास शिंदे अमित कदम सचिन बेलागडे आदी मान्यवर उपस्थित होते

Adv