Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पत्रकार संरक्षण कायद्याची होणार साताऱ्यात होळी

पत्रकार संरक्षण कायद्याची होणार साताऱ्यात होळी

302
Adv

पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्‍यानंतरही पत्रकारांवरील हल्‍ले वाढतच राहिले आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्‍ले होत असल्‍याने त्‍या निषेधार्थ सातारा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दि. १७ ऑगस्‍ट रोजी दुपारी १२ वाजता सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर तसेच तालुका स्‍तरावर त्‍या त्‍या सर्व तहसील कार्यालयांसमोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करुन निदर्शने केली जाणार आहेत.

याबाबतचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा जिल्‍हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, प्रसिध्दीप्रमुख दीपक शिंदे, डिजीटल मिडीया पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सनी शिंदे, सातारा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष ओंकार कदम यांच्यावतीने करण्यात आले आहे.

पाचोरा जि.जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर भ्याड करण्यात आला. या घटनेनंतर मराठी पत्रकार परिषदेची तात्‍काळ बैठक होवून परिषदेचे मुख्य विश्वस्‍त एस.एम.देशमुख यांनी पाचोर्‍यातील घटनेची सविस्तर माहिती देऊन सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्‍यानुसार राज्यातील बहुतांशी पत्रकार संघटना एकत्र आल्‍या 17 ऑगस्ट रोजी राज्यभर निदर्शने करण्याचे ठरले. पत्रकारांचे संरक्षण करण्यास निष्प्रभ ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात 46 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरत आहे. यामुळेच पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील तालुका पत्रकार संघानी त्या त्या तहसील कार्यालय समोर दिनांक 17 रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करावी. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विस्वस्त एस.एम. देशमुख यांच्या सूचनेनुसार सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सातारा जिल्हा पत्रकार संघाने केले आहे.

Adv