Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City शरद पवारांच्या दौऱ्या नंतर साताऱ्यात अजित दादांची बॅनरबाजी

शरद पवारांच्या दौऱ्या नंतर साताऱ्यात अजित दादांची बॅनरबाजी

1569
Adv

कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सातारा जिल्हा दौरा झाला पवार साहेबांच्या दौऱ्याला 24 तास होणाच्या अगोदरच सातारा जिल्ह्यात नूतन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार यांचे शुभेच्छाचे फलक सातारा शहरात लागलेले दिसून येत आहेत यामध्ये सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे खासदार आमदार यांची फोटो गायब असल्याने आहे आश्चर्य व्यक्त केले जात आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली या अजित दादाच्या बंडा नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांनी कालच सातारा जिल्हा दौरा केला या दौऱ्याला 24 तास होण्याच्या अगोदरच सातारा शहरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभेच्छाचे बॅनर ठिकठिकाणी चौकात लागल्याचे दिसून फ्लेक्स बघितल्यानंतर सातारा जिल्ह्यावर नक्की कोणत्या पवारांचे वर्चस्व त्याची चर्चा साताऱ्यातील सर्वसामान्य करत आहे

शुभेच्छा फलकामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल शपथ घेतलेले मंत्री महोदय नूतन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे फोटो दिसून येतात यामध्ये कार्यकारी अध्यक्ष असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो मात्र वगळल्याने सातारा जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे

खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष असून त्यांना शुभेच्छा बॅनर मध्ये कोठेही स्थान देण्यात आले नसून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सातारा जिल्ह्यात बघायला मिळणार हे नक्की

राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या सह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार असलेले आ मकरंद पाटील आ शशिकांत शिंदे आ बाळासाहेब पाटील खासदार श्रीनिवास पाटील यांचेही फोटो या शुभेच्छा फलकावरून गायब असल्याने नक्की फ्लेक्स बोर्ड लावला कुणी याचे कोडे मात्र गुलदस्त्यातच आहे

Adv