साताऱ्यात गांजा ओढण्याचे प्रमाण जास्त पोलिसांचे दुर्लक्ष

535
Adv

सातारा शहरातील काही ठिकाणी गांजाचे वाढत्या प्रमाणाने युवा पिढी त्यास बळी पडत असून पोलिसांनी याप्रकरणी कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरिक करत आहेत

माहुलीचे युवा नेते संतोष जाधव यांच्यावर पानटपरी मध्ये गांजा विकु नको म्हणून हल्ला झाला सातारा शहरात काही ठिकठिकाणी युवा पिढी कॉलेजमधील तरुण गांजाच्या आहारी गेलेले दिसून येतात कमानी हौदा समोरील सातारा पालिकेच्या पार्किंग मध्ये दम मारो दम म्हणत युवा पिढी आपल्या मुखातून धूर सोडताना दिसून येते तसेच गुरुवार बाग, कोटेश्वर मैदान, क्रांती स्मृती मैदान ,यवतेश्वर घाट अशा बरीच ठिकाणी युवा पिढी सिगरेटच्या रूपात गांजा ओडताना दिसून येते पोलीस प्रशासनाने गांजा प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी सातारकर नागरिक करत आहेत

शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतच जास्त गांजा ओढण्याचे प्रमाण निदर्शनास येते यामध्ये अल्पवयीन मुलांचा जास्त समावेश असुन गांजा ओढणाऱ्यां युवकांन बरोबर हुज्जत कोण घालणार हा वाद नागरिक टाळत असून जिल्हा पोलिसांनी याप्रकरणी आता कडक कारवाई करावी अशी अपेक्षा सातारकर जनता करत आहे

Adv