सातारा पालिकेच्या यशाचे छ उदयनराजे यांच्याकडून अभिनंदन

253
Adv

सन 2022-23 या कालावधीत राज्यशासनाव्दारे राबविणेत आलेल्या माझी वसुंधरा या स्पर्धात्मक अभियानामध्ये सातारा नगरपरिषदेने 1 लाख ते 3 लाख लोकसंख्या असलेल्या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवताना, 6 कोटी आणि भूमी थीमॅटीक याकरीता रुपये 2 कोटी असे एकूण 8 कोटीरुपयांचे बक्षिस सातारा नगरपरिषदेने पटकावले आहे. या स्पर्धात्मक यशाबाबद,आम्ही सातारा नगरपरिषदेचे प्रशासक तसेच अभियंता,कर्मचारी यांचेबरोबरच सातारकर नागरीकांचे अभिनंदन करतो,सातारकरांच्या अमुल्य योगदानाचे हे यश आहे अश्या शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांनी सातारा
नगरपरिषदेचा आणि सातारकरांचा गौरव केला आहे.

पृथ्वी,वायु, जल,अग्नी,आणि आकाश या निसर्गाशी संबंधीत पंचतत्वावर आधारित,माझी वसुंधराअभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सन 2020 पासून राबविले जात आहे. यंदा 1 एप्रिल 22 ते मार्च 23 या कालावधीतील तीस-या अमृत-3.0 अभियानामध्ये त्रयस्थ यंत्रणेमार्फत डेस्कटॉप असे समेंटआणि फिल्ड असेसमेंट व्दारे केलेल्या परिक्षणात 1 लाखते 3 लाख लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्यसंस्थामध्ये सातारा नगरपरिषदेचा पहिला क्रमांक आला आहे.

सातारा नगरपरिषदेमध्ये प्रशासकीय राजवटीपूर्वी सातारा विकास आघाडीने घेतलेल्या दूरदर्शी निर्णयामुळे, सातारा नगरपरिषदेची सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे. अत्याधुनिक पध्दतीचे कचरा
व्यवस्थापन,जलस्त्रोतांचे नियोजन, सौरउर्जे निर्मिती, खत निर्मिती,बगिचे विकसित करणे, वृक्षारोपण, या अश्या अनेक पर्यावरणपुरक उपक्रमांमुळे सातारा नगरपरिषदेने पर्यावरणातील समतोल राखण्याचे प्रयत्न आणि निसर्गातील पंचमहातत्वांच्या उर्जेचा चांगला उपयोग करुन घेतला आहे.त्यामुळेच हे घवघवीत प्रथमक्रमांकाचे यश सातारा नगरपरिषदेला मिळाले आहे.याकामी प्रशासक अभिजीत बापट,नगरअभियंत्यांसह सर्वच अधिकारी आणि विशेष करुन कर्मचारी व सातारकर नागरीक यांचे मनापासून अभिनंदन करतो,त्यांचे आभारही मानतो असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे. दरम्यान, 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सातारा जिल्हयातील कहाड नगरपरिषदेने आणी 15 हजार ते 25 हजार लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीमध्ये दहिवडी नगरपंचायतीने देखिल पहिला क्रमांक मिळवत अनुक्रमे एकूण 5 कोटी व 4.50 कोटी रुपयांचे बक्षिस पटकावले आहे.त्याबद्दल तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी,प्रशासक,अधिकारी,कर्मचारी आणि नागरीकांचेही आम्ही आवर्जुन अभिनंदन करतो असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
( श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले)

Adv