खासदार छ उदयनराजे भोसले यांच्या मध्यस्थी नंतर कास ग्रामस्थांनी गेल्या दोन दिवसापासून सुरू केलेले उपोषण बुधवारी मागे घेतले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसागर बॅक वॉटर परिसरातील गावांचा समावेश एमएसआरडीसीच्या च्या प्रस्तावित प्रकल्पामध्ये करण्याचे सुतोवाच केले आहे त्यामुळे कास गावठाणही त्यामध्ये समाविष्ट होत असून या प्रस्तावित आराखड्याच्या नुसार ग्रामस्थांना सर्व सुविधा देण्यात येणार आहे या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांबरोबर होणार असल्याने कास ग्रामस्थांचे सर्व प्रश्न सुटणार आहेत असे स्पष्ट आश्वासन खासदार छ उदयनराजे भोसले यांच्या वतीने एडवोकेट दत्ता बनकर व माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिले आणि कास ग्रामस्थांनी खासदारांची विनंती मान्य करून उपोषण मागे घेतले
अतिरिक्त मुख्य अधिकारी पवन कोडगुले सातारा नगरपालिकेच्या वतीने उपस्थित होते. कास ग्रामस्थांना कास तलावातून पाणी देणे तसेच त्यांच्या रिंग रोड सह मुलकी जमीन उपलब्ध करून देणे या मागण्यासाठी कास ग्रामस्थांनी सोमवार दिनांक 9 जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते . या उपोषणाची माहिती मिळताच खासदार छ उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीचे माजी पक्षप्रतोद एडवोकेट दत्ता बनकर व माजी उपनगराध्यक्ष म्हणून शेंडे यांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या प्रस्तावित प्रकल्पाची माहिती देऊन तात्काळ कास ग्रामस्थांकडे उपोषण स्थळाकडे रवाना होण्यास सांगितले. खा छ उदयनराजे यांच्या वतीने एडवोकेट दत्ता बनकर यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या दालनात चर्चा केली कास तलावातील पाणी ग्रामस्थांना उचलून देणे तसेच त्यांना मुलकी जमीन उपलब्ध करून देणे कास धरणा लगत गावातून दळणवळण सुलभ व्हावे यासाठी रिंग रोड अशा विविध मागण्यांच्या संदर्भातील लवकरच पूर्तता केली जाईल असे आश्वासन देण्यात आले
सातारा पालिकेच्या वतीने काही आश्वासनांसाठी लेखी पत्रही देण्यात आले आहे पवन कोडगुले यांनी हे पत्र ग्रामस्थांना दिले आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित केलेल्या शिवसागर बॅक वॉटर परिसरातील गावांच्या विकासासाठी मिनी महाबळेश्वर प्रकल्प आकार घेत असून या प्रकल्पामध्ये कास आणि लगतच्या गावांचा समावेश होणार आहे या प्रकल्पात समावेश झाल्यानंतर आपोआपच गावठाण आणि त्यातील पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत त्यामुळे पुनर्वसन आणि इतर सुविधांचे प्रश्नच निकाली निघणार आहे असे स्पष्ट आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे . या तातडीच्या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात पुढील आठवड्यात तात्काळ बैठक लावून हे प्रश्न सोडवले जातील असा निरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता एडवोकेट बनकर यांनी ती सर्व माहिती खास ग्रामस्थांना तपशिलात समजावून सांगितली त्यानंतर खासदार छ उदयनराजे यांची विनंती मान्य करून खास ग्रामस्थांनी गेल्या दोन दिवसापासून सुरू केलेले आपले उपोषण पाठीमागे घेतले
यापूर्वी उदयनराजे यांच्या प्रयत्नाने कास गावाला स्मशानभूमी वीज कनेक्शन अंतर्गत सेवा रस्ते यांच्या सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले आहेत असे असे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांनी सांगितले








