सातारा दिनांक 5 प्रतिनिधी
धोम बलकवडी प्रकल्पाच्या व्याहळी वसाहतीमध्ये जलसंपदा विभागाच्या जागेत तब्बल 17 अतिक्रमणे झाली असून ही अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावी अन्यथा 13 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा दिशा विकास मंचचे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला आहे त्यां
सुशांत मोरे यांनी याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की संतोष थोरवे व्याहळी कॉलनी तालुका वाई यांचे जलसंपदा विभागाच्या गट नंबर 76 वर दहा गुंठे क्षेत्रफळाचे साहित्य ठेवणे कामी सहा महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात अर्ज केला होता दहा गुंठ्याच्या ऐवजी तेथे एक एकराची जागा त्यांच्याकडून वापरात आहे त्याचा एक रुपया सरकारी तिजोरीत आलेला नाही पंधरा महिने झाले तरी व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांची जागा ताब्यात ठेवली आहे थोरवे एका मोठ्या कंपनीचे मालक आहेत त्यांनी या जागी हॉट मिक्स प्लांट सुरू केला असून जागेची मागणी व पुलाचे साहित्य या व्यतिरिक्त प्रत्यक्षात तेथे वेगळेच काम सुरू आहे
यमुना थोरवे यांची पिठाची गिरणी व्यवसायासाठी त्यांनी 96 चौरस मीटर जागा भाड्याने घेतली त्याचे भाडे दोन लाख सहा हजार रुपये 650 येणे बाकी आहे तरी जागा त्यांच्या ताब्यात आहे नंदकुमार परदेशी यांच्याकडून भाडेपट्ट्याने येथील जागा वापरात असून त्याचे चार लाख तेरा हजार दोन रुपये भाडे घेणे आहे संगीता विनायक गहिने यांनी इस्त्री दुकानासाठी शासकीय जागेतील 50 चौरस मीटर जागा भाडे करारने घेतले आहे त्यांचे भाडे दोन लाखात हजार पाचशे बत्तीस रुपये घेणे आहे रघुनाथ भिकाजी थोरवे यांनी बोरीव तालुका वाई येथील बोरीवमध्ये मॅग्नोस रिसॉर्ट सुरू केले आहे हे रिसॉर्ट जलाशयालगत असून रिसॉर्टचे दगड धोंडे राडे रोडे टाकून भराव करून येथील जलसाठा कमी केला आहे ते रिसॉर्टचे प्रदूषित पाणी जलाशयात सोडले जात आहे . वाई नगर परिषदेच्या हद्दीत जुना पूल पाडून त्या जुन्या पुलाचा दगड कोठे वापरला गेला हा संशोधनाचा विषय आहे रिलायन्स इन्फ्रा यांना काम यांना देण्यात आले होते हा दगड मॅग्नस रिसॉर्टच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला आहे अशी माहिती आहे यासंदर्भात हरित न्यायालयाला कळविले असून वाई नगर परिषदेच्या कारभार या निमित्ताने शंका निर्माण झाले आहे . नक्षत्र हॉटेल आणि त्यांचा बंगला पंकज होमकर यांच्या मालिकेचा असून प्लॉट नंबर 20 मध्ये त्यांच्या जागेचे अतिक्रमण आहे संबंधित हॉटेल व्यवसायिक अनेक शासकीय अधिकारी राजकीय व्यक्ती यांना पाहुणचारासाठी बंगला देण्यात येतो हॉटेलचे बांधकाम तहसीलदार नगररचनाकार यांची कोणतीही क परवानगी न घेता बांधण्यात आले आहे किसनराव थोरवे व साहेबराव थोरवे यांनी जलाशयालगत सर्वे क्रमांक 111/1 येथे अनधिकृत बांधकाम केले आहे युवराज बापूसाहेब जराड संतोष बाळकृष्ण आंबवले वर्षा ऋतु वाघ व दीपक पोपटोसवाल यांनी दोन धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये शासनामार्फत संपादन केलेली मिळकत आहे तेथे पुण्याचा तलाव व संरक्षण भिंतीचे काम करून अतिक्रमण केले आहे तसेच सह्याद्री बोट क्लब बोरीव येथे अनधिकृतपणे बोट क्लब सुरू केला आहे सोबत हॉटेल सुद्धा सुरू करण्यात आले आहे या कामी धरण व्यवस्थापनाबरोबर करार केला आहे मात्र करार करताना त्यामध्ये कोणतीही स्वयं स्पष्टता नाही जागेचे भाडे शासना कमी प्रमाणात मिळत आहे दोन जलाशयाचे होणारे प्रदूषण आणि जलचर प्राणी यांची होणारी घट याबाबत दोन दोन प्रशांत तोंड गप्पा अजून एक चारुदत्त भास्कर जोगळेकर व केतकी चारोळीकर यांनी अनधिकृत बांधकाम केले वेळोवेळी प्रशासनाने नोटीस देऊन सुद्धा ही बांधकाम पाडण्यात आले नाही
किसनराव भाऊसाहेब बांदल यांनी धरणाच्या पूर्ण संचय पातळीवर लावून बांधकाम केले आहे बिगर शेती परवानगी व बांधकामाचे परवानगी बाबत कोणतेही कागदपत्र ग्रामपंचायत धोम धरण व्यवस्थापन नगर रचना जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत यांच्या रेकॉर्डवर नाही बांदल पुण्यातील मोठे व्यवसायिक आहेत त्यांचे प्रस्थ मोठे असून राजकीय आणि आर्थिक साटेलोटे मोठे आहेत त्यामुळे कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप सुशांत मोरे यांनी केला आहे या एकूण 17 अतिक्रमणांच्या संदर्भात जर तातडीने कारवाई झाली नाही तर दिनांक 13 फेब्रुवारी 2023 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सुशांत मोरे यांनी दिला आहे








