Saturday, July 25, 2026
spot_img
Home Maharashtra महाडिक युवाशक्तीचा दहीहंडी उत्सव छ उदयनराजेंची प्रमुख उपस्थिती

महाडिक युवाशक्तीचा दहीहंडी उत्सव छ उदयनराजेंची प्रमुख उपस्थिती

608
Adv

वनश्री युथ फाऊंडेशन संचलित महाडिक युवाशक्ती दहीहंडी उत्सव २०२२ चे आयोजन शनिवार, दि. २० ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवासाठी खास आकर्षण म्हणून सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड,संतोष जुवेकर, ऋतुजा राणे, लावण्या मइंद हे उपस्थित राहणार आहे. हा उत्सव जयंत खुले नाट्यगृहामध्ये होणार असल्याची माहिती महाडिक युवाशक्तीचे संस्थापक व महाराष्ट्र भाजप कार्यसमितीचे सदस्य सम्राट महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सम्राट महाडीक म्हणाले, गेली अनेक वर्षापासून महाडीक युवाशक्तीच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी दहीहंडीसाठी खा.छ उदयनराजे भोसले,उच्च शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री ना. सुरेश खाडे, सांगोल्याचे आ. शहाजीबापू पाटील, माजी आ. सदाभाऊ खोत, खा. धनंजय महाडिक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

Adv