मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडून कोयना विभाग १०५ गावांमध्ये कोट्यवधींची विकास

623
Adv

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे हे सातारा जिल्ह्यातील कोयनेचे सुपुत्र म्हणून ओळखले जातात. कोयना विभागातील १०५ गाव समाज व्यवस्थेमध्ये दरे तर्फ तांब तालुका महाबळेश्वर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव आहे. त्यांनी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम( उपक्रम), आरोग्य, नगर विकास या खात्यांवर मंत्रीपदी काम करत असताना दरे गावा पुरते मर्यादित विकासकाम न करता संपूर्ण कोयना विभाग १०५ गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे मार्गी लावली आहेत.तर आजही काही विकास कामे मंजूर असून सद्यस्थितीत सुरू असल्याचे कांदाटी खोऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय हरिश्चंद्रराव मोरे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता मुख्यमंत्री जरी झाले असले तरी यापूर्वी देखील त्यांनी ज्या ज्या पदांवरती मंत्री म्हणून काम केले त्या त्या वेळेस त्यांनी दरे गावापुरतं मर्यादित विकास कामे न करता संपूर्ण भागामध्ये विकास कामांचे जाळे विणले आहे यामध्ये प्रामुख्याने जावळी आणि महाबळेश्वर या दोन तालुक्यांचा समावेश होतो १०५ गाव समाज हा कोयना धरण शिवसागर जलाशयाच्या दोन्ही बाजूला विस्तारलेला असून,काही गावे महाबळेश्वर तालुक्यात येतात तर काही गावे जावळी तालुक्यात येतात. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे दरे हे गाव देखील पूर्वीपासून जावळी तालुक्यातच होते मात्र ज्यावेळेस मतदार संघाची फेररचना झाली त्यावेळी जावळी तालुक्यातील ५६ गावे ही महाबळेश्वर तालुक्यामध्ये जोडली गेली त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे हे गाव देखील महाबळेश्वर तालुक्यात जोडले गेले. कोणी कितीही ओरड करत असले तरी एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी कोयना भागामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लावली असून ती पुढील प्रमाणे आहेत. कांदाटी खोऱ्यातील तसेच दरे गाढवली आहिर ते खरोशी रेनोशी या संपूर्ण पट्ट्यातील गावांना तापोळा ,महाबळेश्वर या भागाशी जोडण्यासाठी शिवसागर जलाशयावर आहिर ते तापोळा असा १७२ कोटी रुपयांचा पूल मंजूर करण्यात आला असून त्याचे सद्यस्थितीत काम चालू आहे. महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड येथे मुख्य रस्ता ते आयानचे मंदिर पर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५ लाख, लाखवड येथे मुख्य रस्ता ते आयानचे मंदिर समोर सभासमंडप बांधणे ७ लाख, लाखवड येथे गावांतर्गत सुशोभीकरण करणे १५ लाख, लाखवड येथे गावांतर्गत रस्ते खडीकरण कॉंक्रिटीकरण करणे १५ लाख, गोगवे कातकरी वस्ती येथे सभा मंडप बांधणे ७ लाख, वेळापूर येथील देवारवाडी ते मंदिर ते स्मशानभूमी पर्यंत रस्ता तयार करणे १५ लाख, वेळापूर येथील चीरेखान वस्ती अंतर्गत रस्ते खडीकरण व कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, वेळापूर येथील गावांतर्गत सुशभीकरण करणे ५ लाख, गाढवली येथील गावांतर्गत सुशोभीकरण करणे ५ लाख, वेंगळे येथील मुख्य रस्ता ते शंकर मंदिर पर्यंत रस्ते खडीकरण काँक्रिटीकरण करणे १५ लाख, वेंगळे येथील जननी माता मंदिर येथे फेवर ब्लॉक व पत्र्याचे शेड व सभामंडप बांधणे १५ लाख, वेंगळे येथील शंकर मंदिर समोर मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे ५ लाख, वेंगळे येथील खंडोबा मंदिर ( वरची वाडी) समोर मोकळ्या जागेत सभामंडप बांधणे ५ लाख, रामेघर येथील महादेव कदम यांच्या घराजवळ संरक्षण भिंत बांधणे १५ लाख, रामेघर येथील लक्ष्मण कदम यांच्या घराजवळ संरक्षण भिंत बांधणे १५ लाख, रामेघर येथील गवांतर्गत सुशोभीकरण करणे १० लाख, वारसोळी येथील गावांतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे २० लाख, गाढवली येथील सुरेश माने यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे ७ लाख, गाढवली येथील विष्णू माने यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे १० लाख, वारसोळी येथील मंदिर समोरील मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे २० लाख, हरचंदी येथील पलीकडची वाडी ते जंगमवाडी पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ८ लाख, हरचंदी येथील खिंड ते रुळेच्या नावे पर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५ लाख, तापोळा येथील गणेश मंदिर समोरील मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे २५ लाख, तापोळा येथील शंकर मंदिर समोरील मोकळ्या जागेत सभामंडप बांधणे १० लाख, तापोळा येथील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, तापोळा येथील बौद्ध वस्ती ते विहीर रस्ते काँक्रिटीकरण करणे १० लाख, पाली आटेगाव येथील मुख्य रस्ता ते मारुती मंदिर रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, आहीर येथील मुख्य रस्ता ते विष्णू सकपाळ घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे १५ लाख, आहिर येथील मारुती मंदिर समोरील मोकळ्या जागेत सभामंडप बांधणे ७ लाख, आहिर येथील मुख्य रस्ता ते प्रकाश सपकाळ यांचे घरापर्यंत रस्ता खडीकरण काँक्रिटीकरण करणे २० लाख, तापोळा येथे शिवसागर बोट क्लब जवळ स्वागत कमान बांधणे व शौचालय सुविधा उपलब्ध करणे २५ लाख, गाढवली येथे मंदिरासमोर संरक्षण भिंत बांधणे ९ लाख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरे येथील रस्त्याचे बांधकाम करणे १० लाख, दरे येथील स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण २५ लाख,दरे येथे घराशेजारी संरक्षण भिंतींचे काम करणे ४५ लाख, दरे येथील जननी माता मंदिर शेजारी सभागृह बांधकाम करणे ३० लाख, दरे येथे सार्वजनिक शौचालय बांधणे ५ लाख, दरे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सभागृह बांधणे २० लाख, दरे येथे मूलभूत सुविधा पुरविणे ४ लाख, दरे येथील जननी माता मंदिर ते बाजारवाटेपर्यंत मुख्य रस्त्याच्या बाजूस स्ट्रीट लाईट बसविणे तीन हायमास्ट स्ट्रीट बसविणे २० लाख, दरे येथे मूलभूत सुविधा पुरविणे १५ लाख, दरे येथे गणपती विसर्जन रस्ता तयार करणे २५ लाख, दरे येथे बाजार रस्ता तयार करणे ४५ लाख, दरे येथे गणपती घाट बनविणे २० लाख, दरे येथे मूलभूत सुविधा पुरविणे ५ लाख, दरे येथे मूलभूत सुविधा पुरविणे ७८ लाख, दरे येथे रस्त्यालगत सुशोभीकरण करणे कमानी ते मंदिर १० लाख, दरे येथे नवीन शाळा बांधणे २० लाख, दरे येथे स्मशानभूमी बांधणे ५ लाख, दरे येथे मूलभूत सुविधा पुरविणे ३० लाख, दरे येथील जननी माता मंदिराजवळ संरक्षण भिंत बांधणे १० लाख, दरे येथे मूलभूत सुविधा पुरविणे ५ लाख, दरे येथे स्टेडियम व ग्राउंड टॉयलेट बांधकाम करणे ३० लाख, दरे विहिरीकडे जाणारे रोड तयार करणे ५ लाख, दरे माळावरील गणपती विसर्जन घाट व भिंत बनविणे ३८ लाख, उत्तरेश्वर येथील परिसरामध्ये जांभ्या दगडावरील पेवर ब्लॉक बसविणे ३० लाख, उत्तरेश्र्वर येथे सभामंडळ बांधकाम करणे ३५ लाख, उत्तरेश्र्वर येथे परिसरामध्ये सार्वजनिक शौचालय व बाथरूम बांधणे १५ लाख, उत्तरेश्र्वर मंदिराच्या मागील बाजूस देवाचे लग्न लागते त्या ठिकाणी खुले सभागृह बांधणे ५ लाख, उत्तरेश्वर येथे मूलभूत सुविधा पुरविणे ५.५० लाख, उत्तरेश्वर येथे मूलभूत सुविधा पुरविणे ४० लाख, उत्तरेश्वर येथे मूलभूत सुविधा पुरविणे ४५ लाख, उत्तरेश्वर येथे मूलभूत सुविधा पुरविणे ५ लाख, उत्तरेश्वर येथे मूलभूत सुविधा पुरविणे १५ लाख, उत्तरेश्वर येथे मूलभूत सुविधा पुरविणे २० लाख, उत्तरेश्वर बसण्यासाठी व्यवस्था करणे ५ लाख, उत्तरेश्वर सुशोभीकरण करणे ७ लाख, उत्तरेश्वर खिंडीतून (विसावा) ते उत्तरेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी जांभ्या दगडातील पायऱ्यांचे बांधकाम करणे १० लाख, उत्तरेश्वर गाढवली ते उत्तरेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची मजबुतीकरण व भौमितिक सुधारणा करणे १२० लाख, उत्तरेश्वर मंदिर येथील परिसरामध्ये स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे १० लाख, उत्तरेश्वर येथे मूलभूत सुविधा पुरविणे १० लाख, उत्तरेश्वर तापोळा बंदर रस्ता मजबुतीकरण करणे १० लाख, उत्तरेश्वर येथे गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे १२.५० लाख, कळमगाव कळमकर जननी माता गावदेवी मंदिर समोरील मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे १० लाख, कोट्रोशी येथील शिवाजी महाराज पुतळ्या शेजारी मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणी १० लाख, कोट्रोशी उर्फ बुर्डाणी येथे अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, हरचंदी येथील गणेश मंदिर समोरील मोकळ्या जागेत सभापंड बांधणी ५ लाख, आहिर येथील केदारेश्वर मंदिर समोरील मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणी ५ लाख, गाढवली येथे अंतर्गत रस्ता तयार करणे १० लाख, वेळापूर येथील उत्तरेश्वर परिसराचे सुशोभीकरण व मुख्य रस्ता ते मंदिर पर्यंत खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख, सौंदरी गणेश मंदिर पर्यंत मुख्य रस्ता पासून रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख, कोट्रोशी येथे अंतर्गत रस्ते व गटारी बांधणे १० लाख, चतुरबेट येथे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे ५ लाख, वाळणे येथे मुख्य रस्ता ते उत्तेश्वर मंदिर ते शिवाजी वाडी येथे अंतर्गत रस्ते व गटारे बांधणे १० लाख, आवळण येथील भैरी कुंबळज मंदिर समोरील मोकळ्या जागेत सभामंडप बांधणे ५ लाख, गावढोशी शिवाजी वाडी येथील भैरवनाथ मंदिर समोरील सभा मंडपाला संरक्षण भिंत बांधणे १० लाख, गावढोशी शिवाजी वाडी येथील भैरवनाथ मंदिर सभोवतारी सुशोभीकरण करणे ८ लाख, रेणोशी येथील गोटमाळे वाडी व गावांतर्गत रस्ता व गटारी खडीकरण व काँक्रिटीकरण करणे ५ लाख, खरोशी येथील रखमाई कुंभळज मंदिर परिसरात सुशोभीकरण करणे ५ लाख, झांजवड येथील भैरी देवीच्या मंदिर समोरील मोकळ्या जागेत सभामंडप बांधणे ५ लाख, हातलोट गावदेवी मंदिरा समोरील मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे ५ लाख, घोगलवाडी येथे अंतर्गत रस्ता तयार करणे ५ लाख, तळदेव येथील मुख्य रस्ता ते कृष्णा जंगम यांच्या जागेपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख, निवळी हनुमान मंदिर समोरील मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणी ५ लाख, लामज चव्हाणवाडी येथील लांबजाई नवलाई मंदिर शेजारील रस्त्याला संरक्षण भिंत बांधणी ५ लाख, सालोशी येथील ओढ्याला बंधारा बांधणे ५ लाख, वलवण ओढ्यावर फुल बांधणी ५ लाख, आरव येथे समाज मंदिर बांधणे ५ लाख, कोट्रोशी येथील सोमेश्वर मंदिर येथील मोकळ्या जागेत आठ शौचालय बांधणे ५ लाख, मोरणी येथे समाज मंदिर बांधणे ५ लाख,गावढोशी येथील मुख्य रस्ता ते उषा सकपाळ यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व कॉंक्रिटीकरण करणे व मुख्य रस्त्यास संरक्षण भिंत बांधणे १० लाख, वेळापूर येथे मुख्य रस्ता ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व वेळापूर पाटीलवाडी येथील रस्ते कॉंक्रिटीकरण करणे १५ लाख, वेळापूर पाटीलवाडी ते पानवाटा नदीकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, सौंदरी गवरजाई मंदिर गणेश मंदिर पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १५ लाख, वानवली तर्फे आटेगाव येथील गणेशवाडी अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण काँक्रिटीकरण करणे १५ लाख, कोट्रोशी मुख्य रस्ता ते मंदिर मार्गे लॉन्च धक्का पर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५ लाख, कोट्रोशी मुख्य रस्ता ते बुरडरणी वाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, कळमगाव उफाळे मंदिर समोर सभा मंडप करणे १० लाख, कळमगाव कळमकर मंदिर समोर सभा मंडप करणे १० लाख, आवळण येथील भैरी कुंभळज मंदिर समोरील सभा मंडपास संरक्षण भिंत बांधणे ५ लाख,आहीर येथील विजय विठ्ठल सकपाळ घरासमोर रस्त्यात संरक्षण भिंत बांधणे १५ लाख, आरुषी येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे १२ लाख, आरुषी येथील दोधलेवाडी अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे १२ लाख, झांजवड येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे १५ लाख, कामतवाडी येथील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे १२ लाख, जावळी येथील मधीलवाडी मध्ये सभा मंडप बांधणे १० लाख, वाडा कुंभरोशी विद्यानगर येथील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, दुधोशी येथील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे १२ लाख, दाभेकर येथील मधली वाडी मध्ये सभा मंडप बांधणे १० लाख, कासरूड येथील बौद्ध वस्तीमध्ये सभामंडप बांधणे १२ लाख, हातलोट येथील अंतर्गत खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, कुमठे आबुठकी वस्ती येथे साकव बांधणे १५ लाख, खरोशी येथील सुतारवाडी ते मुख्य रस्ता पर्यंत रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे ७ लाख, वानवली उत्तेकर येथील बौद्ध वस्ती विहार शेजारी सभामंडप बांधणे व विहार जवळ सुशोभीकरण करणे ६ लाख, वानवली उतेकर येथील बौद्ध वस्ती ते स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, वानवली उतेकर येथील गावांतर्गत सुशोभीकरण करणे ९ लाख, दरे येथील क्रीडांगणास दगडाचे पिचिंग करणे ३० लाख, दरे येथील शिव मंदिरास संरक्षण भिंत व सभा मंडप बांधणे ३० लाख, उत्तरेश्वर येथे मंदिराच्या बाजून प्रदक्षणा घालण्यासाठी दगडाचे पेविंग करणे १०० लाख, उत्तरेश्वर येथे मंदिरासमोर सभा मंडप बांधणे १०० लाख, दरे येथील मुख्य रस्त्याला गटर व संरक्षक भिंत बांधणे ७० लाख, उत्तरेश्वर मंदिराच्या मागील बाजूस तलाव बनविणे व बांधकाम करणे २०० लाख, रुळे येथे पाण्याची टाकी बांधणे ३० लाख,गावढोशी ते उतेश्र्वर रस्ता ग्रा. मा.१२५ ची सुधारणा करणे ३० लाख, आकल्पे मुरा ते दोडाणी रस्त्यामध्ये मोऱ्यांचे बांधकाम करणे १०० लाख, दरे येथे वॉकिंग ट्रॅक बनविणे ५० लाख, दोडाणी येथे पाणी साठवण बंधारा बनविणे १०० लाख, दोडाणी येथे सभा मंडप बांधणे ३० लाख, कोट्रोशीयेथे सोमेश्वर मंदिरासमोर सभा मंडप बांधणे ३० लाख, रुळे येथे संरक्षक भिंत बांधणे ३० लाख, वाळणे आवळण हद्द रस्ता तयार करणे ७० लाख,गावढोशी येथे शाळेसाठी सरंक्षक भिंत बांधणे १५ लाख,आहीर येथे स्वागत कमान बांधणे ३० लाख, गाढवली येथे स्वागत कमान बांधणे ३० लाख,गावढोशी येथे पाण्याची टाकी बांधणे २० लाख, खरोशी शाळे शेजारी संरक्षक भिंत बांधणे १५ लाख, गोगवे सुतारवाडी मंदिरा शेजारी सुशोभीकरण करणे १५ लाख, वाळणे येथील पाण्याची लाईन व टाकी दुरुस्ती करणे ३० लाख,आहीर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ संरक्षक भिंत बांधणे ४० लाख, वाळणे ते उत्तेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पायऱ्या बांधणी ३० लाख, लाखवड येथील गावांतर्गत सुशोभीकरण करणे १५ लाख, दरे येथील ग्रामपंचायत कार्यालयाची सुधारणा करणे २० लाख, दरे येथील मुख्य रस्त्यालगत बंदिस्त गटर तयार करणे व पा पाथवे तयार करणे १०० लाख, दरे येथील पंप हाऊस कडे जाणारा रस्ता तयार करणे ३० लाख, दरे येथील शेततळ्याकडे जाणारा रस्ता तयार करणे ३० लाख, दरे येथे काँक्रीट गटर बांधकाम करणे ३० लाख, दरे येथे सोयी सुविधा करणे ३० लाख, उत्तरेश्वर येथे मंदिरासमोरील बाजू संरक्षक भिंत बांधणे ७० लाख, तापोळा येथे सोयी सुविधा करणे ३० लाख, तापोळा येथे तराफासाठी काँक्रीट रस्ता तयार करणे ४० लाख, तापोळा येथील विशाल बोट क्लब येथे लॉन्च कडे जाणाऱ्या रस्त्यावर काँक्रिटीकरण करणे ३० लाख, गाढवली येथील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व गटार बांधणे०/००ते ०/५०० आणि ०/५००ते १/००० ६० लाख, गाढवली येथे सामाजिक सभागृह बांधणी ३५ लाख, दरे येथील अशोक शिंदे यांचे घराजवळून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला कॉंक्रिटीकरण करणे व साकव दुरुस्त करणे ७५ लाख, दरे येथे जननी माता मंदिर येथे संरक्षक भिंत बांधणे २५ लाख, दरे येथील मोरी (पूल) दुरुस्ती करणे ७० लाख,आहीर येथील मारुती मंदिराशेजारी समाज मंदिर बांधणे ३५ लाख,आहीर येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ संरक्षक भिंत बांधणे ३५ लाख, दरे येथे स्मशानभूमीचे बांधकाम करणे ३५ लाख,आहीर येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण व गटर करणे ७० लाख,दरे जननी माता मंदिराजवळ सोयी सुविधा पुरवणे ५० लाख, उत्तरेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट बनविणे ५० लाख, गाढवली येथे रुपेश माने यांच्या घराकडे जाणारा रस्ता बनविणे ३० लाख, उत्तरेश्वर मंदिर येथे सोयी सुविधा पुरविणे ३० लाख, गाढवली येथे सभा मंडप बांधणे ३० लाख, तर डोंगर माथ्यावरील व कांदाटी खोऱ्यातील रस्त्यासाठी देखील निधी उपलब्ध करून दिला आहे यामध्ये इजिमा २६ दरे ते उतेश्र्वर मंदिराकडे जाणारा रस्ता सा. क्र.०/०० ते २/०० साठी ८० लाख,
इजिमा २६ ते गाढवली मुरा अकल्पे मुरा उतेश्र्वर मंदिर लामज मुरा दोडाणी रस्ता सा. क्र.०/००ते १/०० व ७/००ते १३/०० साठी २५० लाख, इजिमा २६ ते उचाट पर्यंत वाघावळे रस्ता सा. क्र.०/००ते २/०० साठी ७० लाख, सालोशी ते सात्विक पेढा रस्ता सा. क्र.०/००ते३/००साठी १०० लाख, कुरळोशी गाढवली वस्ती ते वारणेवस्ती कुरळोशी रस्ता सा. क्र.०/००ते ३/०० साठी १०० लाख, इजिमा २६ ते वलवण चकदेव रस्ता सा. क्र.०/००ते ४/०० साठी ५० लाख,बन( कांदाट) रस्ता सा. क्र.०/०० ते २/०० साठी ५० लाख निधी मंजूर असून कामे देखील सुरू आहेत.तर जावली तालुक्यातील बामणोली येथे गावांतर्गत सोयी सुविधा पुरवणे ३० लाख,बामणोली येथे काँक्रीट रस्ता तयार करणे ४५ लाख,बामणोली येथे सुशोभीकरण करणे २५ लाख, शेंबडी येथे संरक्षक भिंत बांधणे २५ लाख, म्हावशी येथे सोयी सुविधा पुरवणे ४० लाख, कात्रेवाडी येथे सोयी सुविधा पुरवणे ३० लाख, मुनावळे येथे सोयी सुविधा पुरविणे ३० लाख, पावशेवाडी येथील तरफाकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १०० लाख, अंधारी येथील शंकर भागोजी शेलार शाळेच्या सहा खोल्या बांधणे ५० लाख, फळणी येथील जननी माता मंदिरास संरक्षक भिंत बांधणे ३० लाख ,फळणी येथे सभा मंडप बांधणे ३० लाख, शेंबडी येथील मेन रोड ते जननी देवी मंदिराजवळ संरक्षक भिंत बांधणे १० लाख, शेंबडी येथील मेनरोड ते जननी देवी मंदिरापर्यंत काँक्रीटीकरण करणे १५ लाख,दरे व बामणोली येथील जे टी साठी बंधारे बांधणे व तरफा (बार्ज) खरेदी करणे १०० लाख इत्यादी निधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे सांभाळण्यापूर्वी कोयना भागाला दिलेला असून यातील बहुतांश कामे ही प्रगतीपथावर आहेत यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जन्मभूमीवर कर्मभूमी इतकेच प्रेम असल्याचे दिसून येत आहे मुख्यमंत्री नसताना जर का ते आपल्या भागासाठी एवढा निधी देऊ शकतात तर आता तर ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेव्हा याहून अधिक विकास कोयना भाग १०५ गावांमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही.

Adv