Thursday, April 23, 2026
spot_img
Home Maharashtra तो फोटो जुनाच मुख्यमंत्री शिंदे-शरद पवारांच्या भेटीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यालयाकडून खुलासा

तो फोटो जुनाच मुख्यमंत्री शिंदे-शरद पवारांच्या भेटीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यालयाकडून खुलासा

253
Adv

राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या सांगण्यात येत होते मात्र आता या वृत्तावर मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच खुलासा करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या भेटीची बातमी निव्वळ अफवा असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळामध्ये तर्क वितर्कांना उधाण आले होते. मात्र आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून या फोटोच्या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरद पवार साहेब यांची भेट झालीच नाही ती अफवा असल्याचे सांगितले

सोशल मीडियात मुख्यमंत्री शिंदे व शरद पवार यांची भेट झाल्याची चर्चा चांगलीच रंगल्याने मुख्यमंत्री कार्यालयाने यावर खुलासा केला असून ती अफवा असल्याचे सांगितल्याने या विषयावर पडला आहे

Adv