Monday, April 20, 2026
spot_img
Home Maharashtra छ.उदयनराजें विषयी अपशब्द प्रकरणी जिंदालवर गंभीर गुन्हा दाखल करा अन्यथा छ उदयनराजे...

छ.उदयनराजें विषयी अपशब्द प्रकरणी जिंदालवर गंभीर गुन्हा दाखल करा अन्यथा छ उदयनराजे समर्थकांचे राज्यव्यापी आंदोलन

594
Adv

लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील जिंदाल इंडस्ट्रीजचा मालक अशोक जिंदाल याने छ.उदयनराजे भोसले यांच्या बद्दल अपशब्द वापरले प्रकरणी त्याच्यावर तात्काळ गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जिंदाल याला जाब विचारणार्‍या शिवप्रेमींवर दाखल केलेला गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी छ उदयनराजे भोसले समर्थकांच्या वतीने आज इंदापूर येथे जाऊन निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी युवा नेते संग्राम बर्गे माजी नगरसेवक बबलू साळुंखे राजे प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष संतोष घाडगे अमोल भाऊ तांगडे गणेश जाधव पिंटू शेठ जाधव सागर शिंदे पवन पाटील विक्रम शेंडे.आदी मान्यवर उपस्थित होते

अशोक जिंदाल याने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बाबत अपशब्द वापरलेची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झालेली होती. याबाबत काही तरुणांनी संबंधित अशोक जिंदाल यास जाब विचारला होता. या प्रकरणी इंदापुर पोलिसांनी उद्योपतीच्या सांगण्यावरून सत्यता न तपासता एकाच घटेनेचे चुकीच्या पद्धतीने दोन गुन्हे दाखल केले. याप्रकरणी सदर उद्योगपतीवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असताना तरुणांच्यावर गुन्हा दाखल होणे योग्य नाही हे गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा महाराष्ट्रात छत्रपती उदयनराजे भोसले समर्थकांच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी राज्यव्यापी आंदोलनाचा मार्ग निवडावा लागेल अशा इशारा यावेळी समर्थकांच्या वतीने देण्यात आला

Adv