Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District शैक्षणिक शुल्कासाठी पालकांची गळचेपी करू नका खा उदयनराजे भोसले यांचे शाळांना...

शैक्षणिक शुल्कासाठी पालकांची गळचेपी करू नका खा उदयनराजे भोसले यांचे शाळांना आवाहन

463
Adv

ज्ञान हे दान करण्यासाठी वेचले जाते अशी भारतीय शिक्षणाची उत्कृष्ट परंपरा आपल्याला लाभली आहे. सध्या कोरोनाचा काळ सर्वांनाच प्रतिकूल जात आहे. अश्या परिस्थितीत, खाजगी शाळा चालकांनी, हे ही दिवस लवकरच जातील याचा विचार करून, केवळ शैक्षणिक फि किवा शैक्षणिक शुल्क दिले नाही म्हणून पाल्याची आणि पालकांची अडवणुक करू नये, पालकांनीही आपली परिस्थिती असेल तर ज्ञानदान करणा-यांना
यथोचित सहकार्य करावे असे आवाहन करतानाच खा श्रीमंत छ उदयनराजे भोसले यांनी जर का कोणी शाळाचालक,या काळात पालकांची आणि पाल्यांची, शैक्षणिक शुल्काकरीता गळचेपी करीत असेल तर त्याची आम्ही वेळीच दखल घेवू असा इशारा एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.

खाजगी शाळांच्या फिस बावत, पालकांनी उभारलेल्या सातारा जिल्हा पालक संघाच्या चळवळीस आमचा पाठींबा आहे, असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांसह त्यांचे पाल्य यांच्या संयुक्त प्रयत्नांतुन खाजगी शाळा या आपले नांव उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात, त्यामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणा-या शिक्षकांचा वाटा अनन्यसाधारण आहे. तथापि सध्याचा काळ हा अत्यंत खडतर आहे. माणुसकी संपवणारा हा कोरोना काळ शिक्षणाच्या संबंधीत सर्वांचीच परिक्षा पहाणारा आहे. त्यामुळे संस्था चालकांनी शिक्षकांना सर्वोच्य प्राधान्य देत संस्थेच्या व वेळप्रसंगी स्वतःच्या राखिव निधीमधुन, शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मानधन-पगार वेळचेवेळी करावेत. पालकांशी समन्वयातुन आत्ताची परिस्थिती समजुन घेवून, पाल्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घ्यावा. सातारा जिल्हयात केवळ शैक्षणिक
शुल्काकरीता पालकांना जोर जबरदस्ती, अपमानीत करणे, किंवा निकाल राखुन ठेवणे. पुढील वर्षांचा प्रवेश रखडवणे असले प्रकार होत असतील असे वाटत नाही. जर होत असतील तर ते त्वरीत बद करावेत.केवळ शुल्क दिले नाही म्हणून पाल्यांचे शैक्षणिक नुकसान करणे कोणालाच मान्य होणार नाही.

पालकांनीही आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेवून, त्यांनी आपल्या पाल्यांमध्ये पाहिलेली स्वप्ने साकारण्यासाठी प्रामाणिकपणे शाळेशी किल्न, शाळेचीही आर्थिक गैरसोय होणार नाही अशी भुमिका घ्यावी अशी विनंती सूचना आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही खाजगी शाळेतील विद्याथ्यांचे शैक्षणिक शुल्काकरीता आम्ही शैक्षणिक नुकसान होवू देणार नाही, याबाबत अशी प्रकरणे हाताळण्यासाठी जलमंदिर पॅलेस
येथील जनसंपर्क कार्यालयात पालकांनी संपर्क साधावा योग्य तो तोडगा काढला जाईल असेही खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात शेवटी नमुद केले आहे.

Adv