Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District दादा तुमच्या दौर्‍यात बुके येत असतील तर साताऱ्यात कडक लॉक डाऊन कसला

दादा तुमच्या दौर्‍यात बुके येत असतील तर साताऱ्यात कडक लॉक डाऊन कसला

716
Adv

सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन असताना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दौऱ्यात त्यांच्या स्वागतासाठी बुके मिळत असतील तर साताऱ्यात कडक लाॅकडाऊन कसला अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांत रंगू लागली आहे

सातारा जिल्ह्यात कोरणाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यात गेल्या पाच दिवसा पासून जिल्हा प्रशासनाने कडक लाॅक डाऊन करण्याचे आदेश दिले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे कोरोना चा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सातारा दौऱ्यावर होते त्यांच्या दौ-याचा दरम्यान स्वागताला बुके आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली एवढे प्रचंड रुग्ण संख्या असताना तुम्ही माझ्या स्वागताला बुके कशाला आणला असा प्रश्न त्यांनी बुके आणणाऱ्याना केला ही सर्व घटना जिल्हा प्रशासन व त्यांचे प्रमुख डोळ्या देकत बघत होते मात्र कडक लाॅकडाऊन मध्ये बुके मिळालेच कुठे असा प्रश्न साताऱ्यातील नागरिकांना पडला असून बुके जर मिळत असतील तर कडक लाॅकडाऊन कसला असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत

कडक लाॅकडाऊन चे नियम हे सर्वांना सारखेच असतात मात्र जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यादेखत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या स्वागतासाठी मोठमोठे बुके येत असतील तर त्याची चौकशी जिल्हा प्रशासन करणार का हा खरा प्रश्न उपस्थित झाला आहे

Adv