Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Satara Taluka श्री छ उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार शाहूपुरीत बसवले स्ट्रीट लाईट उपाध्यक्ष मनोज...

श्री छ उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार शाहूपुरीत बसवले स्ट्रीट लाईट उपाध्यक्ष मनोज शेंडे

321
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचने नुसार शाहूपुरीतील वार्ड क्रमांक 1 ते 6 येथे स्ट्रीट लाईट बसवले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली

सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढीत शाहुपुरी ग्रामपंचायत समाविष्ट झाल्यापासून शाहुपुरी ग्रामपंचायत हद्दीतील नादुरुस्त पथदिवे बदलायचे काम रेंगाळले होते त्यासंदर्भात माजी पंचायत समिती उपसभापती श्री संजय पाटील, शाहुपुरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री गणेश आरडे माजी सरपंच सौ अमृता प्रभाळे माजी उपसरपंच श्री रमेश धुमाळ श्री अमित कुलकर्णी, श्री सुधाकर यादव श्री शंकर किर्दत श्री राजेंद्र गिरी तसेच काळभैरव पॅनलचे माजी ग्रामपंचायत सदस्य सौ मुग्धा पुरोहित, सौ धनश्री ग्रामोपाध्ये, सौ मयुरा कुलकर्णी,सौ लता राजापुरे श्रीमती लीलाताई शितोळे यांनी माननीय खासदार उदयनराजे यांची भेट घेतली व हे नादुरुस्त पथदिवे तातडीने म्हणजे पावसाळ्यापूर्वी बदलुन त्या जागी व गरज असेल तिथे नवीन पथदिवे बसवणे गरजेचे आहेत हे निदर्शनास आणून दिले,

हि बाब समोर येताच खासदार उदयनराजे यांनी उपनगराध्यक्ष श्री मनोज शेंडे व नगरपरिषदेचे CO श्री अभिजित बापट यांना हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या, त्यामुळे शाहुपुरी हद्दीतील सर्व नादुरुस्त पथदिवे बदलण्याचे काम सरू असून *वाॅर्ड क्रमांक दोन मधील नादुरुस्त पथदिवे बदलण्याचे काम पुर्ण झाले आहे. तसेच वाॅर्ड क्रमांक दोन मध्ये सर्व पथदिव्यांसाठी टायमर बसवण्याचे कामही सुरू आहे

Adv