सातारा जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्राचा विशेष निधी खा उदयनराजे यांचा गडकरींकडे पाठपुरावा

258
Adv

केंद्र सरकारच्या सेन्ट्रल रोड फंड योजनेतुन, केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांना सातारा जिल्हयातील विविध विकास कामे मार्गी लावण्याविषयी विनंती केली असून, ना. नितिन गडकरी यांनी सेन्ट्रल रोड फंडामधुन जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न येणा-या अंदाजपत्रकात केला जाईल असे आश्वासन दिले आहे. ना.गडकरी यांचा दिला शब्द खरा करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो त्यामुळे केंद्राच्या सेन्ट्रल रोड फंड योजनेत सातारा जिल्हयातील अनेक कामांचा समावेश होईलआणि त्याकरीता भरीव निधी मिळेल असा विश्वास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केला आहे.

आमच्या विनंती आणि आग्रहाखातर ना.नितीन गडकरी यांनी आज पर्यंत जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या त्यावेळी सातारा जिल्हयाकरीता विविध विकास कामांसाठी मंजूरी दिली आहे, निधी दिला आहे असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, ग्रेड सेपरेटरकरीता ना.गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस
यांनी मोलाचे सहकार्य केल्या मुळेच आज सातारा सारख्या विकसनशील शहरामध्ये ग्रेडसेपरेटर सारखे देखणे आणि
दूरगामी चांगला परिणाम करणा-या विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले आहे.यापूर्वीही ना.गडकरी यांनी सेन्ट्रल रोड फंड मधुन सातारा जिल्हयाकरीता सतत झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात सातारा जिल्हयातील जास्तीत जास्त विकास कामांचा समावेश केला जाणार आहे.
१.राज्य महामार्ग क्र.१४८ मौजे डिचोली-नवजा-हेळवाक-मोरगिरी-गारवडे-साजुर-विंग-वाठार-रेठरे-शेणोली स्टेशन रोड
२.ता.जावळी,बाई-पाचवड-मेढा रोडचे एमडीआर १९- ४७.००० ते ५३.००० अखेर रस्त्याचे रुंदीकरण
३.राज्य महामार्ग क्र.१३९ पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-भाडळे रस्त्याची सुधारणा करणे
४एमडीआर-२५, पाचगणी-कुडाळ-खडकी-चांदवडी-जाब-किकली-म्हापरवाडी-लगडवाडी रस्ता सुधारणा करणे
५.कराड शहराच्या पूर्वेकडील तासबडे शहापूर ते पाचवडफाटा अखेररिंगरोड तयार करणे
६.कराड शहराच्या पश्चिमभागाकडील साकुर्डे ते पाचवड फाटा अखेर रिंगरोड तयार करणे
७.राज्यमहामार्ग क्र.१४६,/६० पुसेगाव-बडूज-कातरखटाव ते राज्यमहामार्गाचे रुंदीकरण आणि सुधारणा
८.ता.कोरेगांव रहिमतपूर- अंभेरी -बडूज रोड एमडीआर ३८ -००.०० ते २९.००० अखेर रस्ता सुधारणा करणे.
इत्यादी कामांसह आणखीन काही कामे ना.गडकरी यांना सुचविणेत आलेली आहेत.

त्यामुळे या विकास कामापैकी शक्य तितक्या जास्त कामांना केंद्राच्या अंदाजपत्रकात तरतुद करुन, मार्गी
लावण्याचा पाठपुरावा सुरु आहे. त्यामध्ये सर्वाच्या सहकार्याने यश येईलच असेही खासदार श्रीमंत छत्रपती
उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.

Adv