Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Satara City लाच प्रकरणी निलंबित असलेल्या आरोग्य निरीक्षकांची चौकशी सुरू

लाच प्रकरणी निलंबित असलेल्या आरोग्य निरीक्षकांची चौकशी सुरू

447
Adv

लाचखोरीच्या प्रकरणात निलंबीत झालेल्या पालिकेतील तीन आरोग्य निरीक्षकांची मंगळवारपासून चौकशी सुरू झाली. पालिका प्रशासनाने याकामी स्वतंंत्र अधिकाºयाची नेमणूक केली आहे.

घंटागाडी ठेक्याची अनामत रक्कम परत करण्यासाठी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे, प्रवीण यादव व गणेश टोपे यांना २ लाख ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. दि. ८ जून रोजी घडलेल्या या प्रकरणानंतर सर्व अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोरोनामुळे संबंधितांची विभागीय चौकशी होऊ शकली नव्हती. ही चौकशी तब्बल आठ महिन्यांनंतर सुरू झाली आहे.

सेवानिवृत्त प्रादेशिक आयुक्त (पशूसंवर्धन विभाग) डॉ. आर. के. सिंघल यांची पालिका मुख्याधिकाऱ्यांकडून चौकशीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. सिंघल यानी मंगळवारी सर्व अधिकायांनी एकत्र चौकशी केली. दोषारोप व त्याची कागदपत्रे मिळाली का, दोषारोप मान्य आहे का यांसह काही प्रश्न डॉ. सिंघल यांनी अधिकाºयांना विचारले. मात्र, दोषारोप मान्य नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित अधिकाºयांची आता टप्प्याटप्प्याने व स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे. राजेंद्र कायगुडे यांची दि. २५ फेब्रुवारी, प्रवीण यादव यांची २ मार्च तर टोपे यांची ४ मार्च रोजी चौकशी होणार आहे. या प्रकरणातील मुख्य तक्रारदार अमित शिंदे यांनाही लवकरच चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे

Adv