आनेवाडी टोल नाका हस्तांतर आंदोलन प्रकरणी उदयनराजे व 11 समर्थक निर्दोष

170
Adv

वाई:आनेवाडी (ता वाई)टोल नाका येथील टोल हस्तांतर आंदोलन प्रकरणी उदयनराजे व इतर अकरा समर्थकांची वाई न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली
दिनांक ५ ऑक्टोबर २०१७ रोजी संध्याकाळी सहा वाजता आनेवाडी टोल नाका येथे खासदार उदयनराजे, अशोक सावंत, अजिंक्य मोहिते, मुरलीधर भोसले, सनी भोसले ,सुजित आवळे, राजू गोडसे, किरण कुराडे, इम्तियाज बागवान, बाळासाहेब ढेकणे, विवेक उर्फ बंडा जाधव आदींनी जिल्हाधिकारी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.

आनेवाडी टोल नाका येथे अडीचशे जणांचा बेकायदेशीर जवळचा जमवून टोलनाक्यावरील स्थानिक कामगारांचा व दिवाळी बोनसचा मुद्दा व टोल वसुलीचा अधिकार कोणाला देणार नाही असे बोलून टोल हस्तांतरणास विरोध केला होता.यावेळी टोल नाक्यावर टोलनाका हस्तांतर वरून टोलवसुली हस्तांतर आवरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता व व टोल नाका परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले होते यावेळी तेथे मोठा पोलीस बंदोबस्त साईनाथ करण्यात आला होता याबाबत भुईज पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनाजी तानाजी कदम यांनी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याची
तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. त्याची सुनावणी वाई येथील न्या एम एन गिरवलकर यांच्या न्यायालयात झाली. सुनावणी दरम्यान सहा साक्षीदार तपासण्यात आले. अंतिम सुनावणीनंतर उदयनराजे व त्यांच्या अकरा सहकाऱ्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सुनावणीसाठी आज न्यायालयात खासदार उदयनराजे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते .सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी तर उदयनराजे व इतरांच्या वतीने ऍड ताहेर मनेर यांनी काम पाहिले.

Adv