Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City फरार आरोग्य निरीक्षक कायगुडे यांच्यामुळे तिघांना मिळाली तीन दिवसाची पोलिस कोठडी

फरार आरोग्य निरीक्षक कायगुडे यांच्यामुळे तिघांना मिळाली तीन दिवसाची पोलिस कोठडी

184
Adv

लाचखोरी प्रकरणी उपमुख्य अधिकारी संचित धुमाळ आरोग्य निरीक्षक गणेश टोपे व प्रवीण यादव यांना आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली

सातारा पालिकेचे उपमुख्यअधिकारी संचित धुमाळ आरोग्य निरीक्षक प्रवीण यादव व गणेश टोपे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून झालेल्या युक्ती वादांमध्ये आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे हे पसार झाल्याने ते कोणाच्या संपर्कात आहेत याचा शोध मिळेपर्यंत अन्य तपास होईपर्यंत या तीन लाचखोर अधिकाऱ्यांना पोलीस कस्टडी मिळाली आहे

फरार आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे हे कोणाच्या संपर्कात आहेत ते कुठे लपुन बसले आहेत याचा तपास आता सुरू झाला असून लपून बसून काही होणार नाही त्यांना अटक ही होणारच हे मात्र निश्चित असल्याने आपली कर्मकांडे पळून लपणार नाहीत व सातारकरांच्या कर रुपी खाल्लेला पैसा पालिकेत पचत नाही हे या महाशयांनी सिद्ध करून दाखवले

Adv