Monday, April 6, 2026
spot_img
Home Uncategorized तर जयश्री भोसले जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होणार?

तर जयश्री भोसले जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होणार?

106
Adv

शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय जवळजवळ अंतिम टप्प्यात आला असून या निर्णयानंतर वाटा स्टेशन गटाच्या जयश्री राजेंद्र भोसले या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात असून उपाध्यक्ष पद फलटणला मिळावे यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आग्रही असून पालकमंत्री शंभूराज देसाई काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे

शिवसेना राष्ट्रवादी सत्ता स्थापन व्हावी यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन पाटील यांची निवडणुकी पूर्वी बैठक संपन्न झाली होती या बैठकीतच भाजपला डाऊनलून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाला होता

भाजप विरहितच जिल्हा परिषदेत निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होणार हे आता फक्त औपचारिकता बाकी असून असे घडल्यास वाठार स्टेशन गटाच्या जिल्हा परिषद सदस्य व माजी महिला बालकल्याण सभापती पदाच्या अनुभव असलेल्या जयश्री राजेंद्र भोसले याच प्रमुख दावेदार होऊ शकतात त्यांचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पालकमंत्री शंभूराज मंत्री मकरंद पाटील यांच्याशी असलेले संबंध व पक्षाशी एकनिष्ठता

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद फलटणला मिळावे यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आग्रही असून पालकमंत्री शंभूराज देसाई काय निर्णय घेणार याकडेही लक्ष लागले असून सत्ता स्थापनेचा कधी मुहूर्त कधी निघतोय याकडेच आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे

Adv