सोनगाव कचरा डेपोत आढळला जैविक कचरा आरोग्य निरीक्षकांचे दुर्लक्ष

42
Adv

पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत घरगुती कचरा सोडून जैविक कचरा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे सदरचा जैविक कचर्‍याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी लागते तसे न होता चोराच्या उलट्या बोंबा हाच धंदा वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांच्या आशीर्वादाने चालत असल्याचे आजच्या घटनेवरून दिसून आले

पालिकेच्या कचरा डेपो मध्ये जैविक कचरा आढळल्याने एकच खळबळ उडाली हा जैविक कचरा इथे कसा आला कोणाच्या संमतीने कचरा डेपोमध्ये तो टाकण्यात आला पालिकेचे कर्मचारी येथे नव्हता का असा भला मोठा प्रश्न उभा राहिला आहे

पालिकेचे आरोग्य निरीक्षक यांच्या दुर्लक्षाने हा जैविक कचरा इथं आल्याचे दिसते काही हॉस्पिटल कडून निरीक्षक लक्ष्मी दर्शन घेऊन हा कचरा तिथे टाकण्यास टेबलाखालून परवानगी देत असल्याचे चित्र सध्या पालिकेत पहावयास मिळते सदरचया कचऱ्यामध्ये रक्ताच्या कापसाचे बोळे मास्क हॅन्ड ग्लोज ऑपरेशनचे कापड व मानवी अवयवाचे तुकडे असल्याने तिथे भटकी कुत्री वावरत असून तो सर्व जैविक कचरा रस्त्यावर ओढत आणला असून याला जबाबदार कोण असा प्रश्न सोनगाव व परिसरातील नागरिकांनी विचारला आहे

वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मलिदा खायच्या भूमिकेत असतात त्यातलाच हा एक नमुना म्हणावा लागेल वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांचे कामाकडे दुर्लक्ष असतेच हे सातारानामाने वारवार समोर आणलेच आहे

Adv